नागपूर,
winter-session : इंडिगोचा भोंगळ कारभार आणि हिवाळी अधिवेशनातील गर्दी लक्षात घेता नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान विशेष गाडी चालविण्याची घोषणा मध्य रेल्वे केली आहे. गत दहा प्रवासी संख्येत वाढ झाल्यामुळे मध्य रेल्वे, नागपूर मंडळाच्या वतीने गाडी क्रमांक ०१०१२ नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई (एक फेरी) ही गाडी १४ डिसेंबर रोजी रात्री २२.१० वाजता नागपूरहून सुटून दुसर्या दिवशी दुपारी १५.०५ वाजता सीएसएमटी, मुंबई येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर फेरी) ही गाडी १६ डिसेंबर रोजी दुपारी १५.३० वाजता सीएसएमटी, मुंबईहून सुटून दुसर्या दिवशी सकाळी ०६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. या विशेष गाडीला मार्गात वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ,जळगाव मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर असे थांबे आहे.