रत्नागिरी,
Veda Sarfare दोन वर्षाच्या बाळाचे बोबडे बोलणे आणि अडखळत उभं राहणे ही आई-वडिलांसाठी आनंदाची बाब असते. मात्र रत्नागिरीतील वेदा सरफरे या फक्त १ वर्ष ९ महिन्यांच्या चिमुरडीने तर खरोखरच कमाल केली आहे. वेदा भारतातील सर्वात लहान वयातील जलतरणपटू म्हणून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरले आहे. अवघ्या १० मिनिटांत १०० मीटरचा पल्ला पार करून तिने तिच्या गावी आणि कोकणवासीयांमध्ये हौस निर्माण केला आहे.
वेदा हिचा पोहण्याचा प्रवास नऊ महिन्यांच्या वयातच सुरू झाला. रत्नागिरी येथील शासकीय जलतरण तलावात तिने पहिल्यांदाच पाण्यात हातपाय मारायला सुरुवात केली. तिच्या मोठ्या भावाने, रुद्र सरफरे, नियमित सराव करत असताना तिला पाण्यात उतरायला प्रोत्साहन दिले. प्रशिक्षक महेश मिलके यांच्या मार्गदर्शनाखाली वेदाने हळूहळू पोहायला शिकले आणि पाण्याची भीती नंतर पूर्णपणे दूर झाली.
वेदाचे जन्म २२ जानेवारी २०२४ रोजी झाला Veda Sarfare असून, पोहण्याची आवड लागल्यावर तिने १० मिनिटे ८ सेकंदात १०० मीटर अंतर पार केले. तिच्या या कामगिरीची माहिती इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने २५ नोव्हेंबर रोजी अधिकृत ईमेलद्वारे कळवली. यामुळे वेदा भारतातील सर्वात लहान वयातील जलतरणपटू म्हणून नोंद झाली आहे.वेदाचे आई-वडील, पायल आणि कुटुंबातील इतर सदस्य तिच्या या यशामुळे अत्यंत आनंदी आहेत. वेदाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या पोहण्याचे व्हिडिओ पोस्ट केले जातात, ज्यावर अनेक चाहत्यांकडून प्रेमळ प्रतिसाद मिळत आहे. वेदाचे हे कौतुकास्पद यश केवळ तिच्या कुटुंबापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण कोकणवासीयांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.वयाच्या एवढ्या अल्पावधीत तिने साधलेल्या या कामगिरीमुळे जलतरण क्षेत्रातही नवीन प्रेरणा निर्माण झाली आहे. वेदाचा हा प्रवास तरुण जलतरणपटूंना नक्कीच मार्गदर्शन करणार आहे.