१३ तारखेला वर्धेत राष्ट्रीय लोक अदालत

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
national-lok-adalat : विधि सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा सत्र न्यायालय, कामगार न्यायालय तसेच जिल्हातील सर्व तालुयातील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार १३ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
KL
 
 
न्यायालयातील तडजोड पात्र प्रलंबीत प्रकरणे आपसी सामंजस्यातून तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी लोक अदालत हे प्रभावी माध्यम म्हणून ठरले आहे. लोक अदालतीद्वारे अनेक पक्षकारांनी आपली प्रकरणे वेळेआधी निकाली काढली आहे. त्यामुळे पक्षकारांना वेळ, खर्च आणि मानसिक त्रास टाळता येतो. लोक अदालतीत तडजोडीद्वारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे प्रलंबीत प्रकरणातील पक्षकार यांच्यासोबतच शासन आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा लाभ प्राप्त झाला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षकारातील संबध सलोख्याचे राहतात.
 
 
तसेच लोक अदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबीत खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. न्यायालयात दाखल असलेली सर्व तडजोड पात्र प्रलंबीत प्रकरणे, दिवाणी दावे तसेच वाद दाखलपूर्व तडजोड पात्र प्रकरणे येत्या राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीने निकाली काढल्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा मुख्यालयासह जिल्हातील सर्व तालुका न्यायालयामध्येही लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोड पात्र फौजदारी, एन. आय. अ‍ॅटची (धोयाचे धनादेश) प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, घरभाडे/मालमता विवाद प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, ग्राहक तकार मंचाची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहे.