वर्धा,
ankit-hiware : ईला हायरिंग टेनालॉजीच्या वतीने कौशल्य रोजगार उद्योजकता, नावीन्यता विभाग व इतर विभागासोबत करार करून जिल्ह्यातील युवकांना नवीन तंत्रज्ञानावर आधारीत रोजगार श्रम अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देऊन पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून दिल्याने ईला हायरिंग टेनालॉजीचे संचालक युवा उद्योजक अंकित हिवरे यांचा मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.
विदेशात उच्च शिक्षण घेऊन भरघोस वेतनाची नोकरी उपलब्ध झाली असतानासुद्धा स्वतःच्या जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्टार्टअप अंतर्गत ईला हायरिंग टेनालॉजीची स्थापना केली. जिल्ह्यातील युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पात्रनेतुसार विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करून शेकडो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिपचे मुख्य कार्यपालन अधिकारी पराग सोमन, सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, उपआयुत प्रकाश देशमाने, सहाय्यक आयुत नीता अवघड आदी उपस्थित होते.