भारतीयांनी २०२५ मध्ये गुगलवर हे आजार केले सर्वाधिक सर्च? पूर्ण टॉप सर्च लिस्ट पाहा

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
top search list आपल्याला जर एखादी गोष्ट माहिती नसेल तर आपण लगेच ती जाऊन गुगलवर सर्च करतो. असंच यावर्षी भारतीयांनी आरोग्यविषयक माहिती सर्च करण्यासाठी गुगलला प्रथम प्राधान्य दिलं असून ते सर्वात विश्वासार्ह व्यासपीठ ठरलंय. हलकी डोकेदुखी असो किंवा तीव्र ताप, हात-पाय सुन्न पडणं असो किंवा पोटदुखी या उपचार घेण्यापूर्वी अनेकांनी गुगलवर सर्च करून माहिती घेतली आहे..बहुतेक लोक डॉक्टरांकडे जाण्याआधी इंटरनेटवर शरीरात नेमकी काय समस्या आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण वर्षभरातील गूगल ट्रेंड्सने हे दाखवलंय की, भारतातील युझर्स कोणत्या आरोग्याची माहिती सर्वाधिक घेतात. .
 
 

गुगल सर्च  
 
 
हिवताप
हा 2025 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक गूगल केलेली समस्या आहे. साधारणपणे शरीराचं तापमान वाढतं. भारतीय लोकांनी गुगलवर याबाबत सर्वाधिक माहिती सर्च केली आहे. .सकाळी उठताच बॉडीमध्ये दिसताय ही लक्षणे? असू शकते High Blood Pressure ची समस्या, वेळीच घ्या काळजी.
 
डोकेदुखी
डोकेदुखी हे भारतात सर्वाधिक शोधलं जाणाऱ्या आरोग्याच्या समस्यांपैकी एक आहे. ही सामान्य समस्या असली तरी ती वाढत गेल्यास गंभीर आजारांचे संकेत असू शकतात. .
 
खोकला
खोकला हा भारतात सर्वाधिक गूगल केली आजारी अजून एक समस्या आहे. खोकला हा साध्या ऍलर्जीपासून ते गंभीर फुफ्फुसांच्या आजारापर्यंतचे संकेत देऊ शकतो. हवामान बदल, प्रदूषण वाढ, धूळ-माती किंवा व्हायरल संसर्गामुळे खोकला सुरू होतो..
घशात खवखव
यंदाच्या वर्षी भारतीयांनी खशात होणाऱ्या खवखवीबाबत देखील इंटरनेटवर सर्च केलं आहे. यामागे प्रदूषण, व्हायरस, बॅक्टेरिया, ऍलर्जी, टॉन्सिलाइटिस अशी कारणं असू शकतात..
 
शरीरदुखी
अंगदुखी किंवा शरीर दुखणं आता भारतात अत्यंत सामान्य समस्या झाली आहे. पूर्वी ही समस्या प्रामुख्याने वृद्धांमध्ये दिसत होती, पण आता ती तरुणांमध्ये आणि अगदी मुलांमध्येही वाढताना दिसतेय.top search list अनेक दिवसांपासून शरीर किंवा सांध्यांमध्ये वेदना कायम असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे..
 
छातीत दुखणं
छातीत दुखणे हे चिंताजनक समस्यांपैकी एक आहे. भारतीयांनी याबाबतही इंटरनेटवर सर्च केलं आहे. छातीत दुखल्यानंतर लगेच लोकांना हृदयविकाराचा झटका येतो. यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात..
 
उलटी
अनेकांना कोणताही त्रास झाला की उलटी होते. भारतीयांनी याबाबत देखील गुगलवर सर्च केलं आहे. यावर उपचार कसे केले जातात याबाबत लोकांनी सर्च केलं आहे.