यवतमाळ नगर परिषदेचा उडाला धुरळा

नऊ नगर परिषद अध्यक्ष रिंगणात : शनिवारी होणार मतदान

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Yavatmal Municipal Council election अपिल प्रकरणांमुळे बाधित झालेल्या यवतमाळ नगर परिषदेची निवडणूक शनिवार,20 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी प्रचारसुद्धा सुरू झाला आहे. नगर परिषद अध्यक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी कुणीच माघार घेतली नाही. त्यामुळे निवडणूक रिंगणात पुन्हा 9 उमेदवार उभे ठाकले आहेत.
 

यवतमाळ, Yavatmal Municipal Council election 
नगर परिषद अध्यक्षपदासह 58 नगरसेवकपदांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षांमध्ये युती, आघाडी झाली नाही. सर्वच प्रमुख पक्ष निवडणूक, स्वबळावर निवडणुकीला समोर जात आहे. भाजपा, काँग्रेस, उद्धवसेना, शिंदेसेनेसह बसपाने नगर परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला आहे.शिवाय चार अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत. 29 प्रभागांत सदस्यपदासाठी एकूण 299 उमेदवार आहेत. यात प्रमुख पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमानुसार येथील नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार होती. उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्यात असतानाच अपील प्रकरणांमुळे आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे उमेदवारांचा खर्च आणि परिश्रम पाण्यात गेले.
या नगर परिषदेत होणार निवडणूक
यवतमाळ नगर परिषदेसोबत वणी येथील प्रभाग क्रमांक 14 क, पांढरकवडा येथे प्रभाग क्रमांक 8 अ आणि प्रभाग क्रमांक 11 ब तर दिग्रसमध्ये प्रभाग क्रमांक 2 ब, प्रभाग क्रमांक 10 ब व प्रभाग क्रमांक 5 ब ची निवडणूक 20 डिसेंबर रोजी होणार आहे. अपिल प्रकरणांमुळे येथील निवडणूक आयोगाने पुढे ढकलली होती.नामांकन मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर येथे उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे.