'परसेप्शन एक्स्पो'चे थाटात समारोप

महिला उद्योजकांसाठी ठरले महत्वाचे व्यासपीठ

    दिनांक :12-Dec-2025
Total Views |
नागपूर,
women entrepreneurs expo गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था व एमएसएमई डीएफओ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजकांसाठी दिनांक ६ ते ९ डिसेंबर दरम्यान आयोजित 'परसेप्शन एक्स्पोचे थाटात समारोप झाले.
 
 
 
women entrepreneurs expo
यावेळी आयोजित समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांची तर, प्रमुख अतिथी म्हणून नागपूर गार्डन क्लबच्या उपाध्यक्षा डॉ. राजश्री बापट यांच्यासह विजया भुसारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नेहा लघाटे यांनी संस्थेच्या कार्यबदल माहिती दिली, तसेच 'परसेप्शन एक्स्पोच्या यशस्वितेबद्दल देखील सविस्तर माहिती दिली. हा मेळावा महिला उद्योजकांच्या कला, कौशल्य व व्यवसायाला नवी दिशा देणारा ठरला. मेळाव्यात हस्तशिल्प, सजावटीचे साहित्य, आकर्षक आभूषणे, पारंपरिक दागिने, गृहोपयोगी अशा अनेक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध झाल्या. अध्यक्षीय भाषणात कांचन गडकरी यांनी सर्व सहभागी महिलांचे अभिनंदन केले. या मेळाव्यात एकूण ७३ महिला उद्योजकांनी आपले स्टॉल लावले होते. दरम्यान जवळपास २५ ते ३० हजार नागरिकांनी या मेळाव्याला भेट दिली. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मयंक लघाटे, शितल बनसोड, नीलिमा गढीकर, वर्षा शर्मा व कविता भुरे यांनी परिश्रम घेतले.