धोत्रा जहागीर शंकर पटात यवतमाळचा शिवा राजाची जोडी अजिंय

    दिनांक :12-Dec-2025
Total Views |
कारंजा लाड,
Shankarpat competition तालुयातील धोत्रा जहागीर येथे संपन्न झालेल्या शंकरपट स्पर्धेत अ गटात यवतमाळ येथील शिवा राजाची जोडी अव्वल ठरली असून, क गटात मध्यप्रदेशमधील सेवा भैरव जोडीने तर गावगाडा गटात नवसाळ येथील तेजा मल्हार जोडीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
 

Shankarpat competition 
८ ते १० डिसेंबर Shankarpat competition  पर्यंत चाललेल्या शंकर पट स्पर्धेत तिन्ही गटात अनेक नामांकित जोड्यांनी सहभाग घेतला होता.अ गटात यवतमाळ येथील नितीन तिवारी यांच्या शिवा राजा जोडीने प्रथम, कुरुम येथील राज दमाये यांच्या महकाल पिंट्या जोडीने दुसरा, प्रमोद दिवटे एकलासपूर यांची लखन पॉईंट जोडी व पैलवान मेहकरची चिम्या रॉकी जोडी संयुक्त तिसरी तसेच क गटात अभिषेक लवरास मध्यप्रदेश यांची सेवा भैरव पहिली, सतिश वर्मा व भागवत कदम वाशीम यांची मल्हार सिस्टमची जोडी दुसरी, सै.लतीफभाई बागवान मेहकर यांची शेरिया डेव्हिड जोडी तिसरी आली. गावगाडा गटात मोहन रोकडे नवसाळ यांची तेजा मल्हार जोडी पहिली, राजू पाटेकर राहटी यांची पर्‍या सर्जा ची जोडी दुसरी, बजरंग शिंदे शेमलाई यांची बेटरी राजाची जोडी तिसरी आली आहे. एकूण १.८३ लाख बक्षिसांचे वितरण यावेळी करण्यात आले.
 
 
’अ’ पहीले बक्षीस ३१ Shankarpat competition  हजार रुपये, दुसरे बक्षीस २० हजार रुपये, तिसरे बक्षीस १५ हजार रुपये, चौथे बक्षीस १० हजार रुपये, पाचवे बक्षीस ६ हजार रुपये,सहावे बक्षीस ५ हजार रुपये, सातवे बक्षीस ४ हजार रुपये, आठवे बक्षीस ३ हजार रुपये, नववे बक्षीस अडीच हजार रुपये ’क’ गटासाठी पाहिले बक्षीस २१ हजार, दुसरे बक्षीस १५ हजार,तिसरे बक्षीस ९ हजार, चौथे बक्षीस ७ हजार,पाचवे बक्षीस ५ हजार, सहावे बक्षीस ४ हजार, सातवे बक्षीस साडे तीन हजार, आठवे बक्षीस तीन हजार, नववे बक्षीस २ हजार आणि दहावे बक्षीस दोन हजार रुपये तर गावगाडा गटासाठी पाहिले बक्षीस पाच हजार, दुसरे बक्षीस ४ हजार, तिसरे बक्षीस तीन हजार, चौथे बक्षीस दोन हजार आणि पाचवे बक्षीस १००० रुपये ठेवण्यात आले होते. बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असल्याचे या शंकरपटाचे मुख्य आयोजक जिवन जाधव यांनी कळविले आहे.