नेत्याची बदनामी अंगलट, पत्रकारांना कारावास

amol mitkari-disgrace-nagpur युट्यूब चॅनलचे चार पत्रकार दोषी

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
नागपूर,
 
 
amol mitkari-disgrace-nagpur विधीमंडळ अधिवेशन (winter session nagpur) संपण्याच्या टप्प्यावर असताना, विशेषाधिकार समितीने चार पत्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. आज याविषयी घोषणा करताना, विदर्भातील ‘सत्यलढा’ या युट्यूब चॅनलच्या (you tube channel) चार पत्रकारांवर कारवाई करण्याची शिफारस समितीच्या वतीने करण्यात आली. आमदार अमोल मिटकरी यांची बदनामी करणारा मजकूर यु ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रकाशित केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. सनसनी निर्माण करणाऱ्या बातम्या देण्याच्या नादात अशा प्रकारचे वृत्तांकन (journalism) करण्यात आले का? यादृष्टीने विचार करण्याची वेळ असल्याची चर्चा आहे.
 

amol mitkari-disgrace-nagpur 
 
 
amol mitkari-disgrace-nagpur विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांची बदनामी केल्याप्रकरणी ‘सत्यलढा’ या युट्यूब चॅनलच्या चार पत्रकारांना 5 दिवसांच्या कारावासात पाठविण्याची शिफारस विशेषाधिकार समितीने केली. मात्र, या युट्यूब चॅनलच्या संपादकांनी माफी मागितल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, असे वार्तांकन करणाऱ्यांमुळे पत्रकारीतेवरील विश्वासाची मुळे हलतील, अशी चर्चा विधीमंडळ परिसरात सुरू होती.