दिल्लीतील ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवात फटाक्यांवर मनाई

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Ban on firecrackers in Delhi गोव्यातील नाईट क्लबमध्ये घडलेल्या भीषण आगीनंतर दिल्लीतर्फे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये फटाक्यांवर सक्त मनाई केली आहे. या घटनेत किमान २५ जणांचा जीव गेला, ज्यामुळे राजधानीतील क्लब, रेस्टॉरंट्स आणि बारसाठी सुरक्षा नियम अधिक कडक केले गेले आहेत. दिल्ली उत्पादन शुल्क विभागाने १० डिसेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात सर्व हॉटेल, क्लब आणि रेस्टॉरंट्स परवाना धारकांना अग्निशमन एनओसी वैध ठेवण्याची आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेची पूर्ण खात्री करण्याची सूचना दिली आहे.

Ban on firecrackers in Delhi
परिसरात पारंपारिक असो वा इलेक्ट्रिक, कोणत्याही प्रकारचे फटाके पूर्णपणे बंदी आहेत. नियमाचे उल्लंघन झाल्यास, दिल्ली उत्पादन शुल्क कायदा २००९ आणि नियम २०१० अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. शहरात सुमारे ९५० रेस्टॉरंट्स, बार आणि क्लब नोंदणीकृत असून, ९० चौरस मीटर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या सर्व आस्थापनांना वेळेवर अग्निशमन एनओसी नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. कोणतेही निमित्त स्वीकारले जाणार नाही, अशीही कडक सूचना दिली आहे.