सीबीएसईच्या पुस्तकात छत्रपतींचाइतिहास 86 शब्दात गुंडाळल्यावरून संताप

- विधान परिषदेत आरोपांच्या फैरी

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
नागपूर,
cbse pustak एससीईआरने तयार करून दिलेल्या अभ्यासक्रमानुसार सीबीएसइच्या इतिहासाच्या आठवीच्या पुस्तकात 86 शब्दात शिवाजी महाराजांचा इतिहास गुंडाळल्याचा मुद्दा आज विधान परिषदेत आज गाजला. शासनाने याबाबत जातीने लक्ष घालून याचा पाठपुरावा करावा आणि अशी मागणी काँग्रेसचे आमदार सत्यजीत तांबे यांनी केली. एससीईआरटी मार्फत याचा पाठपुरावा केला जाईल असे, शिक्षण राज्य मंत्री पंकज भोयर यांनी उत्तरात सांगितले.
 
 

cbsc pustak 
 
 
कमी शब्दाचा इतिहास हा महाराजांचा अवमान असल्याचे किशोर दराडे यावेळी म्हणाले. तर युट्युबवरून संभाजी महाराजांविषयी बदनामीकारक व्हिडिओ व मचकूर हटविण्याची मागणी केली. यावर पंकज भोयर म्हणाले की, अभ्यासक्रमात द राईज ऑफ मराठाच्या माध्यमातून 2200 शब्दांचा इतिहास नमूद आहे. परंतु ही माहिती कमी असेल तर ती अधिक वाढविण्यासाठी एनसीआरटीकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे ते म्हणाले.cbse pustak बदनामीकारक व्हिडिओ आणि मचकूर हटविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शिवचरित्र साधन खंड निर्मिती
शिवाजी महाराज अस्सल चरीत्र साधन खंड निर्मिती करण्याची मागणी अमोल मिटकरी यांनी केली. यावर खंड निर्मिती करणार असल्याचे आश्वासन भोयर यांनी दिले. त्याच प्रमाणे शाळांमध्ये शिवचरित्रांचे वाचन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.