सीसीआयपेक्षा खासगी व्यापार्‍यांची चांदी

*२३ हजार १२७ शेतकर्‍यांनी विकला २ लाख २९ हजार क्विंटल कापूस

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
वर्धा,
cci-private-traders : सीसीआयच्या जाचक अटींमुळे अनेक शेतकर्‍यांनी सीसीआयकडे पाठ फिरविली. परिणामी शेतकरर्‍यांनी खासगी व्यापार्‍यांना कापूस विक्री केला. १० डिसेंबरपर्यंत सीसीआयपेक्षा खासगी बाजारपेठेत सर्वाधित कापूस खरेदी केल्याचे वास्तव समोर आले आहेत. २३ हजार १२७ शेतकर्‍यांचा २ लाख ९४ हजार ९८५.६७ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. मात्र, खासगी व्यापार्‍यांकडून हमीभावपेक्षा कमी दराने कापूस खरेदी करीत आहेत. जिल्ह्यात सीसीआयपेक्षा खासगी व्यापार्‍यांचीच चांदी होताना दिसत आहेत.
 
 
j
 
 
 
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर सोयाबीनवर रोगराई आल्याने हजारो हेटरांमधील सोयाबीन बाधित झाले. काही शेतकर्‍यांनी उभ्या पिकांवर रोटावेटर फिरविले तर काहींना एकरी दोन-तीन पोत्यावर समाधान मानावे लागले. त्यानंतर कपाशी पिकाला हजारो रुपये खर्च करून डवरणी, वखरणी, फवारणी केली. कापसाचे चांगले उत्पन्न होईल, अशी आशा शेतकर्‍यांना होती. मात्र, बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने हजारो रुपयांची फवारणी केली. बोंडअळींचा प्रादुर्भाव कमी झाला. परिणामी, शेतकर्‍यांना एकरी ४ ते ५ क्विंटल कापूस हाती आला. त्यानंतर पर्‍हाटी काढून रब्बीसाठी शेत तयार केले.
 
 
कापसाला हमीभाव मिळावा यासाठी जिल्ह्यात सीसीआयचे १३ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शेतकर्‍यांना सीसीआयकडे कापूस विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे बंधकारक आहे. कपास किसान अँपवर ३८ हजार ८७ शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. खासगी व्यापार्‍यांना २३ हजार १२७ शेतक-यांचा २ लाख ९४ हजार ९८५.६७ क्विंटल कापूस खरेदी केला आहेत. मात्र, खासगी व्यापारीन हमीभावपेक्षा कमी दर देत शेतकर्‍यांची लूट करीत आहेत. त्यामुळे सीसीआयची कापूस खरेदी जलतगतीने व्हावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहेत.
 
 
सीसीआयकडून जिल्ह्यात १३ केंद्रातून खरेदी सुरू आहे. ३८ हजार ८७ हजारांना सीसीआयकडे नोंदणी केली असून ६ हजार ८६९ शेतकर्‍यांचा १ लाख ३० हजार ४६८.९१ क्विंटल कापूस १० डिसेंबपर्यंत खरेदी केला आहे. मात्र, सीसीआयची संथगतीने खरेदी सुरू आहे. परिणामी, नाईजास्तव काही शेतकरी खासगी व्यापार्‍यांना कापूस देत आहेत. सध्या सीसीआयकडून चांगल्या प्रतिच्या कापसाला ८ हजार ६० रुपये प्रति क्विंटल दर दिले जात आहे तर खुल्या बाजारात ७ हजार ५०० पर्यंत प्रति क्विंटल मिळत आहेत.
सीसीआयच्या कपास किसान अँपवर नोंदणी करावी लागते. नोंदणी केलेल्या शेतक-यांचा सीसीआय कापूस खरेदी करत असतो. सीसीआयच्या अनेक जाचक अटी आहेत. त्यामुळे नाईजास्तव खासगी व्यापार्‍यांना कापूस द्यावा लागतो. त्यात आर्थिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी अरुण खंगार यांनी दिली.