गडचिरोली,
Dharmaravbaba Atram, तब्बल 1977 पासून म्हणजे जवळपास 47वर्षांपासून रखडलेल्या चेन्ना मध्यम सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी 12 डिसेंबर रोजी विधिमंडळात केली.
चेन्ना नदीवरील या मध्यम प्रकल्पास मूळ प्रशासकीय मान्यता 13 मे 1977रोजी मिळाली होती. तेव्हाची प्रकल्प किंमत 182.55 लाख एवढी असताना आजवर सरकारकडून 14,300 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 13.99 दलघमी एवढा उपयक्त जलसाठा निर्माण होणार आहे.
जलसंधारणमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार विभागाने प्रथम सुधारित प्रशासकीय प्रस्ताव तयार करून 10 जून 2025 रोजी सिंचन महामंडळाकडे पाठवला. त्यानंतर महामंडळाने 13 ऑगस्ट 2025 रोजी हा प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. तांत्रिक मंजुरी मिळताच पर्यायी वनीकरणासाठीची प्रक्रिया सुरू होइल. मुलचेरा तालुक्यातील 18 गावांचे 2342 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून हजारो शेतकर्यांचे भवितव्य बदलू शकते, असे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.