तिकिट घेतलं, पण मेस्सी दिसलाच नाही! चाहत्यांचा संताप अनावर

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
कोलकाता,
Fans were angry because Messi लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याला कोलकात्यापासून सुरुवात झाली असून त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. काल रात्रीपासूनच कोलकाता विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यानंतर साल्ट लेक स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमातही हजारो चाहते उपस्थित होते. मात्र हा कार्यक्रम अपेक्षेप्रमाणे न घडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.
 

messi 
मेस्सी स्टेडियममध्ये दाखल झाल्यानंतर काही वेळातच चाहत्यांचा संताप उफाळून आला. अनेकांनी स्टेडियममध्ये खुर्च्या आणि पाण्याच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केली, त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. कार्यक्रमासाठी तिकिटे खरेदी करून आलेल्या चाहत्यांचा आरोप होता की, त्यांना मेस्सीचा चेहरा नीट पाहायलाही मिळाला नाही.
 
 
 
एका संतप्त चाहत्याने माध्यमांशी बोलताना या कार्यक्रमावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याच्या मते, हा संपूर्ण कार्यक्रम निराशाजनक ठरला. मेस्सी अवघ्या दहा मिनिटांसाठी उपस्थित राहिला आणि त्याभोवती राजकीय नेत्यांचा गराडा होता, त्यामुळे चाहत्यांना त्याला पाहणेही शक्य झाले नाही. मैदानावर त्याने ना चेंडू खेळला, ना कोणतीही पेनल्टी घेतली. कार्यक्रमादरम्यान शाहरुख खान येणार असल्याचेही सांगण्यात आले होते, मात्र तोही दिसला नाही. चाहत्यांच्या मते, या कार्यक्रमात त्यांचे पैसे आणि भावना दोन्ही वाया गेल्या. घटनेनंतर आयोजकांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, चाहत्यांचा संताप आणि निराशा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.