कोण आहे गायक फ्लिपरॅची? 'धुरंधर' मधील गाण्याला बनवले

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
मुंबई,
FlippRachi सध्या सर्वत्र चर्चेत असलेला धुरंधर हा चित्रपट केवळ कथानकामुळेच नव्हे, तर अक्षय खन्नाच्या दमदार एंट्रीमुळेही प्रचंड गाजत आहे. विशेषतः त्यांच्या एंट्री सीनसाठी वापरण्यात आलेला बॅकग्राउंड ट्रॅक सोशल मीडियावर ट्रेंड करत असून, या गाण्याचा स्वतंत्र फॅन बेस तयार झाल्याचे चित्र दिसत आहे. इंस्टाग्राम रील्सपासून यूट्यूब शॉर्ट्सपर्यंत सर्वत्र हा ट्रॅक ऐकू येत असून, प्रेक्षक त्यावर ठेका धरताना दिसत आहेत.
 

 FlippRachi, Hussam Asim, 
कोण आहे रॅपर
चित्रपटात अक्षय खन्ना पाकिस्तानातील कुख्यात गुंड रहमान डकैतच्या भूमिकेत दिसत असले, तरी त्यांच्या एंट्रीसाठी वापरण्यात आलेले गाणे मात्र भारतातील नसून बहरीनमधील आहे. ‘Fa9la’ नावाचा हा रॅप सध्या ‘अक्षय खन्ना एंट्री ट्रॅक’ म्हणून ओळखला जात आहे. हा रॅप बहरीनचा प्रसिद्ध रॅपर फ्लिपराची याने बहरीनी भाषेत गायला असून, अक्षय खन्नाच्या आयकॉनिक एंट्रीसोबत या गाण्याने प्रेक्षकांवर जादू केली आहे.फ्लिपराची उर्फ हुस्साम असीम हे खाडी देशांमध्ये आधीपासूनच लोकप्रिय नाव आहे.
 
 
अरबी हिप-हॉप FlippRachi आणि खलीजी-स्टाइल रॅपसाठी ते ओळखले जातात. ‘Fa9la’ हे खलीजी रॅप प्रकारातील गाणे असून, त्यात पारंपरिक अरबी वाद्ये आणि आधुनिक हिप-हॉप बीट्सचे प्रभावी मिश्रण ऐकायला मिळते. हे गाणे मूळत: २०२४ मध्ये रिलीज झाले होते. मात्र, धुरंधर चित्रपटात संगीतकार शाश्वत सचदेव यांनी या गाण्याचा वापर करत अक्षय खन्नाच्या खलनायकाच्या एंट्रीसाठी बॅकग्राउंड ट्रॅक तयार केला आणि तो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला.फ्लिपराची यांना अवघ्या १२व्या वर्षापासून संगीताची आवड होती. किशोरवयातच त्यांनी रॅप करायला सुरुवात केली. विविध स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत काम केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी Straight Out Of 2 Seas हा पहिला स्टुडिओ अल्बम रिलीज केला, ज्यातील We So Fly हा ट्रॅक लोकप्रिय ठरला. त्यानंतर डैफी या कलाकारासोबत त्यांनी 9ARAT हा अल्बम सादर केला. यातील Ea Laa हे गाणे मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, यूट्यूबवर त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.फ्लिपराची यांच्या या यशाची दखल घेत २०२४ मध्ये त्यांना ‘बहरीन आर्टिस्ट ऑफ द ईयर’ हा प्रतिष्ठित पुरस्कारही देण्यात आला होता. मागील काही वर्षांत भारतीय प्रेक्षकांमध्ये मिडल-ईस्ट बीट्स आणि गाण्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. यापूर्वी २०२३ मध्ये एनिमल*चित्रपटात बॉबी देओलच्या एंट्रीदरम्यान वाजलेले इराणी गाणे ‘जमाल कुडू’ प्रचंड व्हायरल झाले होते. त्याच धर्तीवर आता *धुरंधर*मधील बहरीनचा रॅप ‘Fa9la’ही देशभरातील प्रेक्षकांच्या ओठांवर रुळला असून, चित्रपटाच्या लोकप्रियतेत मोलाची भर घालत आहे.