विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर कायमच असलेली गर्दी

हिवाळी अधिवेशनात प्रवेशपासचा काळाबाजार - विधान परिषदेत हेमंत पाटील यांनी सांगितला किस्सा - कृपाल तुमाने यांनी दिले कार्यवाहीचे निर्देश

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
नागपूर,
hiwali convention हिवाळी अधिवेशनासाठी विधिमंडळात प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या पासचा काळाबाजार होत असल्याचा आरोप आज विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी केला. कायकर्त्यांसोबत घडलेला किस्साच त्यांनी सभागृहात सांगत अशाप्रकारे प्रवेश दिला जात असेल समाजविघातक कृत्य करणारेही सहजरित्या विधानभवनात प्रवेश करू शकतात, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
 
 
 
 
adhivation
 
 
दुपारच्या सत्रात विधानपरिषदेचे काम सुरू झाल्यावर आमदार हेमंत पाटील यांनी तालिका अध्यक्षांकडे हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, माझ्या दोन कार्यकर्त्यांना एका कामानिमित्त विधानभवन परिसरात यायचे होते. यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र त्यांना पास मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना तुमचे आत येणे शक्य नसल्याचे सकाळी सांगितले. परंतु त्याच दिवशी सायंकाळी ते दोन कार्यकर्ते मला विधानभवन परिसरात भेटले. प्रवेश कसा मिळाला, याबाबत विचारणा केली असता दीड हजारात पास विकत घेतल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. हा प्रकार फारच भयंकर असून सुरक्षेच्या दृष्टीने चिंता त्यांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटना चिंतादायक असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधिमंडळात परिसरात प्रवेशासाठी आवश्यक असणाèया प्रवेशपासच्या विक्रीची चौकशी करावी व विक्री करण्यात सहाय्य करणाèया अधिकाèयांवर कार्यवाही करण्याचे निर्देश तालिका सभापती कृपाल तुमाने यांनी दिले.
हिवाळी अधिवेशनात होत असलेल्या गर्दीने फार त्रास सहन करावा लागत असल्याचे पासेसवर नियंत्रण असावे अशी मागणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली होती. त्यामुळे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि उपसभापती नीलम गोèहे यांनी विशेष सूचना देत अनावश्यक गर्दी होेणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली होती.