जम्मू-काश्मीर 'थंडा थंडा कूल कूल'... पारा १७ अंशांवर

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
श्रीनगर,
Jammu Kashmir cold wave जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या बहुतांश भागांमध्ये तीव्र थंडीची लाट कायम असून सर्व हवामान केंद्रांवर तापमान शून्याखाली नोंदवले गेले आहे. काश्मीर खोरे आणि लडाखला जोडणाऱ्या झोजिला दर्र्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून येथे पारा थेट उणे १७ अंश सेल्सियसपर्यंत घसरला आहे.
 

Jammu Kashmir cold wave  
काश्मीर खोऱ्यात सकाळच्या वेळी अनेक भागांमध्ये दाट धुके पसरले होते. त्यामुळे विशेषतः महामार्गांवर वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने वाहनचालकांना सावधपणे आणि कमी वेगाने वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून अपघात टाळता येतील.
 
 
श्रीनगरमध्ये किमान Jammu Kashmir cold wave  तापमान उणे २.९ अंश सेल्सियस नोंदवले गेले, तर श्रीनगर विमानतळावर ते उणे ४.० अंशांपर्यंत खाली गेले. काझीगुंडमध्ये उणे १.६ अंश, पहलगाममध्ये उणे २.८ अंश, कुपवाडामध्ये उणे २.४ अंश आणि कोकरनागमध्ये ०.१ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. प्रसिद्ध स्की रिसॉर्ट गुलमर्गमध्ये किमान तापमान १.६ अंश सेल्सियस होते.खोऱ्यातील इतर भागांमध्येही थंडीचा जोर कायम राहिला. पंपोरमध्ये उणे २.५ अंश, अवंतीपोरा उणे ३.६ अंश, बडगाम उणे ३.१ अंश, अनंतनाग उणे २.५ अंश, बारामुला उणे ३.२ अंश, बांदीपोरा उणे २.१ अंश, पुलवामामध्ये उणे ४.२ अंश आणि शोपियांमध्ये उणे ३.७ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. कुलगाममध्ये ०.१ अंश, गंदेरबलमध्ये उणे १.८ अंश, सोनमर्गमध्ये उणे ०.३ अंश आणि जेथन रफियाबादमध्ये उणे ३.१ अंश सेल्सियस तापमान होते.
 
 
जम्मू विभागात मात्र काश्मीरच्या तुलनेत तापमान थोडेसे अधिक राहिले. जम्मू शहरात किमान तापमान १०.३ अंश सेल्सियस, तर जम्मू विमानतळावर १०.९ अंश नोंदवले गेले. कटरा येथे १०.२ अंश, कठुआ आणि बटोटे येथे ८.० अंश, तसेच रियासीमध्येही ८.० अंश सेल्सियस तापमान होते. भद्रवाहमध्ये ३.६ अंश, बनिहालमध्ये ३.८ अंश, उधमपूरमध्ये ३.४ अंश, राजौरीमध्ये ३.८ अंश, रामबन आणि सांबा येथे ५.९ अंश, किश्तवाडमध्ये ७.८ अंश आणि डोडामध्ये ७.३ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.लडाखमध्येही थंडीचा प्रभाव अधिक जाणवला. लेह येथे किमान तापमान उणे ५.६ अंश, कारगिलमध्ये उणे ५.२ अंश आणि नुब्रा खोऱ्यात उणे ५.७ अंश सेल्सियस नोंदवले गेले. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उंचावरील भागांमध्ये पुढील काही दिवस तीव्र थंडी कायम राहण्याची शक्यता असून, मैदानी भागांमध्येही रात्रीचे तापमान कमीच राहणार आहे.