पिंपरी-चिंचवड,
legislative assembly मार्च महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरात पाकिस्तानी बनावटीची मोठ्या प्रमाणात सौंदर्यप्रसाधने आढळून आल्याची घटना राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. यावर प्रतिक्रिया देत भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी राज्य विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात ‘कॉस्मेटिक जिहाद’चा मुद्दा उपस्थित केला आणि यास गंभीर राष्ट्रसुरक्षा धोक्याचा भाग मानून त्वरित कारवाईची मागणी केली.
विधिमंडळात बोलताना महेश लांडगे यांनी या प्रकरणाकडे फक्त व्यापारी दृष्टिकोनातून नव्हे, तर शत्रू राष्ट्राचा धोका म्हणून पाहण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. “शत्रू राष्ट्राची बनावटी सौंदर्यप्रसाधने थेट आपल्या शहरात पोचली आहेत. त्यामुळे हे फक्त व्यापाराचे प्रश्न नाहीत, तर शहरात घुसखोरी करून लोकांच्या जीवनात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे. या घटनेमागील मास्टरमाइंड शोधून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.महेश लांडगे यांनी या प्रसंगी पिंपरी-चिंचवडमध्ये बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांबाबत देखील चिंता व्यक्त केली. गेल्या दोन-तीन वर्षांत पोलिसांनी 70 हून अधिक घुसखोरांवर कारवाई केली असली, तरी यापुढे कारवाई अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राजकीय वर्तुळात या घोषणेने मोठा गदारोळ उडवला असून, अनेक सामाजिक व व्यापारी संघटनांनी या घटनेवर सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, सौंदर्यप्रसाधने कशी शहरात पोचली याचा शोध घेण्यात येत आहे.या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने भीती निर्माण झाली असून, स्थानिक प्रशासनाला सतर्कतेची शिफारस करण्यात आली आहे.