हिंगणघाटमध्ये १ लाख ११ हजाराचा मांजा जप्त

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
हिंगणघाट, 
manja-seized : शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध विक्री करणार्‍यांविरोधात पोलिसांनी काल कारवाई करीत जकीर अहमद खान अब्दुल गणी खान (५९) रा. लेबर कॉलनी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. विेशेष म्हणजे तो शासन सेवेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहे.
 

manja 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार १२ रोजी पोलिस हवालदार अनुप टपाले व त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शहरातील लेबर कॉलनी परिसरातील गार्डन जवळील जकीर अहमद खान अब्दुल गणी खान याच्या घरी छापा टाकला. झडती दरम्यान घरातील तीन मोठ्या प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये विविध रंगांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा आढळून आल्याने टी.एन. कंपनीचे ३१ बंडल ३१ हजार रुपये, मोनो कोट कंपनीचे ७३ बंडल ५८ हजार ४०० रुपये तसेच किंग कंपनीचे ३७ बंडल २२ हजार २०० रुपये असा १ लाख ११ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आला. नायलॉन मांजा अमरावती येथून आणून विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.