रस्ता व नाली बांधकामाच्या चौकशीसाठी मार्कंडादेव येथे आंदोलन

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
चामोर्शी,
Markandadeo Road मार्कंडादेव येथील चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या रस्ता व नाली बांधकामाविरोधात गुरुवारी ग्रामस्थांनी आंदोलन छेडले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.माजी आमदार डॉ. देवराव होळी व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सुरू असलेले बांधकाम तांत्रिक निकषांना धरून नसून, निधीचा गैरवापर व नियमांचे उल्लंघन होत असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे. अनेक वेळा संबंधित अधिकार्‍यांना तक्रारी देऊनही दखल न घेतल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.
 

Markandadeo Road and Drainage Construction Protest, 
यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासोबत सरपंच संगीता मोगरे, ग्रामपंचायत सदस्य देवराव तिवाडे, तंटामुक्ती अध्यक्ष लिलाधर मरस्कोल्हे, नामदेव महाराज नागपुरे, मुखरू शेंडे, प्रेम नामदेव कोडापे, मनोज हेजीब, नितेश जुमनाके, रमेश कोडापे, संतोष सरपे, रुपम शेंडे, राकेश झाडे, सुचिता कुलसंगे, उषा कुलसंगे, उमाकांत आभारे, राजू मोगरे, सुरेश शहा, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, जयराम चलाख तथा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.