महानगरपालिका निवडणूक एकत्रित लढणार

सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
नागपूर,
ramdas-athawale : एकनाथ शिंदे गट, रा.काँ. अजित पवार गट यांच्यासह भाजपासोबत आमची युती कायम असल्याने आगामी महानगरपालिका निवडणूक आम्ही लढणार आहे. मुंबईसाठी १५ ते १६ जागा आणि नागपूर महानगरपालिकासाठी ७ ते ८ जागेची मागणी रिपब्लिकन पक्षाकडून केली असल्याची माहिती पत्रपरिषदेत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
 
 
ramdas-athwale
 
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्त्याने विधानभवन परिसरात ते बोलत होते. ते म्हणाले, विदर्भाच्या विकासासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन जाते. आमागी महानगरपालिका निवडणूकीत आमची महायुती राहणार आहे. शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रा.काँचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजपासोबत निवडणूक लढण्याचे ठरले आहे. यापूर्वी रिपब्लिकन पक्षासेाबत युती केल्याने महायुतीला चांगले यश मिळाले आहे.
 
 
महानगरपालिकासाठी निवडणूकीसाठी मित्र पक्ष असलेल्या भाजपासोबत रिपब्लिकन पक्ष प्रामाणिकपणे उभा आहे. महापालिका पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात येत आहे. आगामी काही दिवसात महापालिकेची आचरसंहिता लागू होणार आहे. महायुतीत राहून निवडणूक लढणार असल्याने जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा तसा भाजपचा पूर्वीपासूनचा मित्रपक्ष आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आपल्या कोट्यातून आम्हाला जागा द्याव्यात अशी आमची आहे.