मुंबई,
OTT releases this week, ओटीटी प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची मेजवानी सजली आहे. जिओ हॉटस्टार, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, अॅपल टीव्ही+ आणि झी५सह विविध प्लॅटफॉर्म्सवर एकाच दिवशी अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. सस्पेन्स थ्रिलरपासून ते फॅमिली एंटरटेनर आणि मिस्ट्री-क्राइमपर्यंत वेगवेगळ्या जॉनरमधील कंटेंटमुळे हा वीकेंड प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.
हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट यांचा स्पोर्ट्स ड्रामा *एफ१ द मूवी* हा या आठवड्यातील प्रमुख आकर्षण ठरत आहे. १९९० च्या दशकातील एका निवृत्त फॉर्म्युला वन ड्रायव्हरची ही कथा असून, एका भीषण अपघातानंतर जवळपास संपुष्टात आलेल्या कारकिर्दीला पुन्हा एकदा नवी दिशा मिळते. जुन्या मित्राच्या मदतीने तो पुन्हा ट्रॅकवर परततो आणि नव्या ड्रायव्हरसह रेस करतो. चित्रपटात जेवियर बार्डेम, केरी कोंडन आणि डॅमसन इड्रिस यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असून, हा चित्रपट अॅपल टीव्ही+ वर प्रदर्शित झाला आहे.
तेलुगू वेब सीरिज OTT releases this week, थ्री रोजेस*चा दुसरा सिझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मुंबईत राहणाऱ्या तीन मैत्रिणी अॅड एजन्सी सुरू करतात, मात्र फ्रान्सहून परतलेल्या एका धोकादायक गँगस्टरमुळे त्यांचे आयुष्य उलथापालथ होते. ईशा रेब्बा, राशी सिंग आणि कुशिता कल्लापु यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही सीरिज ‘अहा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे.तमिळ पीरियड ड्रामा *कांथा* देखील चर्चेत आहे. १९५० च्या दशकातील मद्रासच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात दिग्दर्शक अय्या आणि त्यांचा सुपरस्टार शिष्य टी.के. महादेवन यांच्यातील अहंकाराचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. हा संघर्ष पुढे एका हत्येच्या रहस्यात बदलतो. दुलकर सलमान, समुथिरकानी आणि राणा दग्गुबाती यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
सस्पेन्स थ्रिलर *साली मोहब्बत*मध्ये राधिका आप्टेने साकारलेली स्मिता ही गृहिणी अचानक दुहेरी हत्याकांडाच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडते. तिच्या पतीचा आणि चुलत भावाचा मृत्यू झाल्यानंतर उलगडणाऱ्या रहस्यांची गुंफण या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. दिव्येंदु शर्मा पोलीस अधिकारी रतन पंडितच्या भूमिकेत दिसणार असून, टिस्का चोपडा दिग्दर्शित हा पहिला चित्रपट झी५वर पाहता येत आहे.
कौटुंबिक आणि हलक्याफुलक्या मनोरंजनासाठी *सिंगल पापा* ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. कुणाल खेमूने साकारलेला घटस्फोटीत तरुण अचानक मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतो आणि त्यानंतर सुरू होणारा त्याचा संघर्ष या सीरिजमध्ये विनोदी पद्धतीने मांडण्यात आला आहे. प्राजक्ता कोळी, मनोज पाहवा आणि आयशा रझा यांच्या भूमिका लक्षवेधी ठरत आहेत.
जिओ हॉटस्टारवर OTT releases this week, प्रदर्शित झालेली *द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली* ही कॉमेडी-ड्रामा सीरिज देखील चर्चेत आहे. एका युवा लेखिकेच्या आयुष्यातील कौटुंबिक आणि व्यावसायिक संघर्ष याभोवती ही कथा फिरते. कृतिका कामरा, श्रेया धनवंतरी, शीबा चड्ढा आणि फरीदा जलाल यांच्या अभिनयाने ही सीरिज अधिक प्रभावी झाली आहे.याशिवाय नेटफ्लिक्सवर *वेक अप डेड मॅन: अ नाइफ्स आउट मिस्ट्री* ही बहुप्रतीक्षित मिस्ट्री सीरिजही प्रदर्शित झाली आहे. गुप्तहेर बेनोइट ब्लँक एका धार्मिक समुदायातील बंद खोलीतील हत्येचा तपास करतो, अशी या सीरिजची कथा आहे.
एकूणच, या शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर विविध जॉनरमधील दर्जेदार कंटेंट उपलब्ध झाल्याने प्रेक्षकांसाठी हा वीकेंड मनोरंजनाने भरलेला ठरणार आहे.