पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजप अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
लखनऊ,
Pankaj Chaudhary, Uttar Pradesh BJP भारतीय जनता पक्ष (भाजप) लवकरच उत्तर प्रदेशच्या नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा करणार आहे. यापूर्वीच लखनौमधील भाजप कार्यालय फुलांनी आणि तिरंगी फुग्यांनी सजवण्यात आले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांची उत्तर प्रदेश भाजप अध्यक्षपदासाठी निवड होण्याची शक्यता आहे. शनिवारी त्यांनी लखनौमधील भाजप कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या नामांकनासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक व केशव प्रसाद मौर्य यांनी प्रस्तावक म्हणून काम केले.
 
 
राज्यमंत्री पंकज चौधरी
पंकज चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सांगितले की, सर्व भाजप आमदारांना बोलावण्यात आले आहे आणि प्रदेशाध्यक्ष निवडणूक लवकरच होईल. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले की, भाजप प्रदेश अध्यक्षपदाची निवडणूक सुरू आहे आणि सर्व कार्यकर्ते नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी सज्ज आहेत. पंकज चौधरी यांचे प्रस्तावक म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रिजेश पाठक, स्मृती इराणी, स्वतंत्र देव सिंह, सूर्य प्रताप शाही, सुरेश खन्ना आणि बेबी राणी मौर्य यांचा समावेश आहे.
 
केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले की, भाजप उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून उद्या निवडणूक पार पडेल. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप २०२७ मध्ये समाजवादी पक्षाला पराभूत करेल अशी अपेक्षा आहे. जसे बिहारमध्ये जिंकले, त्याप्रमाणे उत्तर प्रदेशातही विजय मिळवण्याचा आम्हाला विश्वास आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.