धन्यवाद तिरुवनंतपुर...

एननडीएच्या विजयावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
तिरुवनंतपुर,
Prime Minister Modi's reaction केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी पूर्ण होताच तिरुवनंतपुरममध्ये एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला असून या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत भाजप-एनडीएला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया देत नागरिकांचे आभार मानले आणि हा निकाल केरळच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले.
 
 

thank u modi 
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, धन्यवाद तिरुवनंतपुरम! महानगरपालिकेत भाजप-एनडीएला मिळालेला जनादेश हा केरळच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण आहे. लोकांनी दाखवलेला विश्वास स्पष्ट करतो की केवळ एनडीएच राज्याच्या विकासाच्या आकांक्षा पूर्ण करू शकतो. आम्ही या शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू. याच पोस्टमध्ये त्यांनी विजयासाठी मेहनत करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी म्हटले की, हा निकाल केरळमधील तळागाळातील कार्यकर्त्यांच्या पिढ्यान्‌पिढ्यांच्या परिश्रमांचे फळ आहे आणि हे कार्यकर्तेच पक्षाची खरी ताकद आहेत.
 
 
 
यानंतर केरळमधील एकूण नागरी निवडणुकांवर भाष्य करताना पंतप्रधान मोदींनी दुसऱ्या पोस्टमध्ये सांगितले की, भाजप आणि एनडीएच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या केरळमधील जनतेचे ते मनापासून आभार मानतात. केरळचे नागरिक आता यूडीएफ आणि एलडीएफ या दोन्ही आघाड्यांना कंटाळले असून, सुशासन देऊ शकणारा आणि सर्वांसाठी संधी निर्माण करणारा एनडीए हाच एकमेव पर्याय असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. तिरुवनंतपुरम महानगरपालिक त झालेल्या या निवडणुकीत एनडीएने एकूण ५० जागांवर विजय मिळवला आहे. एलडीएफला २९, यूडीएफला १९ तर इतरांना दोन जागा मिळाल्या आहेत. १०१ वॉर्ड असलेल्या महानगरपालिकेत बहुमतासाठी ५२ जागांची आवश्यकता असताना एनडीए बहुमताच्या अगदी जवळ पोहोचला आहे. या निकालामुळे केरळच्या राजधानीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.