रयत सेवाभावी प्रतिष्ठानला ‘महाराष्ट्र आयकॉन अवार्ड’

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव,

Rayat Sevabhavi Pratishthan आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार राजदूत संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र आयकॉन अवार्ड 2025 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सामाजिक कार्यात अग्रगण्य ठरलेल्या जवळगाव ता. हिमायतनगर येथील रयत सेवाभावी प्रतिष्ठान संस्थेचा सन्मान करण्यात आला. पुणे येथे आयोजित भव्य समारंभात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सटवा पवार यांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 

Rayat Sevabhavi Pratishthan 
रयत सेवाभावी प्रतिष्ठानने गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील गरजू घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कार्य केले आहे. शिक्षण, आरोग्य, सामाजिक जनजागृती तसेच सेवाभावी कार्याच्या माध्यमातून संस्थेने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कार्याची दखल घेऊन संस्थेला महाराष्ट्र आयकॉन अवार्ड 2025 प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना सटवा पवार यांनी हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून संस्थेशी जोडलेले सर्व दानशूर दाते, सदस्य, पत्रकार आणि सहकार्य करणाèया प्रत्येकाचा असल्याचे सांगितले. भविष्यातही अशाच प्रकारचे सहकार्य सामाजिक कार्यासाठी मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सटवा पवार यांचे निवृत्ती वानखेडे, प्रभाकर दहिभाते, गजानन अनंतवार, चिल्लोरे यांनी अभिनंदन केले. या पुरस्कारामुळे रयत सेवाभावी प्रतिष्ठानच्या कार्याला अधिक बळ मिळाले असून पुढील काळातही समाजहितासाठी नवनवीन उपक्रम राबवण्याचा निर्धार संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.