जनसंवाद विद्यार्थ्यांना विधानसभेचा प्रत्यक्ष अनुभव

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Student legislative experience, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून व्यावसायिक कौशल्ये विकसित व्हावीत, या उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विशेष अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले.
 
Student legislative experience,
 
 
या अभ्यासदौर्‍यात Student legislative experience, विद्यार्थ्यांनी विधानभवन, नागपूर येथे भेट देत विधानसभेचे तसेच विधानपरिषदेचे कामकाज प्रत्यक्ष पाहिले. विधानमंडळाची रचना, लोकप्रतिनिधींची भूमिका, अधिवेशनातील प्रश्नोत्तर तास, चर्चासत्रे, निर्णयप्रक्रिया आणि कायदेनिर्मितीची संपूर्ण प्रक्रिया यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या प्रेक्षागृहात उपस्थित राहून प्रश्नोत्तर तासाचे कामकाज अनुभवले. सत्ता पक्ष व विरोधी पक्षातील सदस्यांमधील प्रश्नोत्तर व चर्चांमधून लोकशाहीतील उत्तरदायित्व, संवाद आणि निर्णयप्रक्रियेचे प्रत्यक्ष दर्शन विद्यार्थ्यांना झाले.यावेळी प्रा. डॉ. धर्मेश धावनकर यांनी विधानभवनाची कार्यपद्धती, अधिवेशनाचे महत्त्व तसेच विधानमंडळाच्या कामकाजात माध्यमे व पत्रकारांची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माध्यम अभ्यासाच्या दृष्टीने अशा अभ्यासदौर्‍यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या उपक्रमात शिक्षक आनंद भिसे व डॉ. मनीषा मोहोड उपस्थित होते. अभ्यासदौर्‍यातून प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने पत्रकारिता व जनसंवाद विषयातील अभ्यास अधिक सखोल व प्रभावी झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.