स्वामिनी मनोज श्रीवास यांना रौप्य पदक

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
बुलढाणा,
Swamini Manoj Shrivastav शारदा ज्ञानपीठ, बुलढाणा साठी अत्यंत अभिमानास्पद अशी कामगिरी विद्यार्थिनी स्वामिनी मनोज श्रीवास्तव हिने केली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती विभागस्तरीय सायकलिंग स्पर्धा वाशिम येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत स्वामिनी हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदक पटकावले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या यशासाठी तिला मनोज श्रीवास यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
 

Swamini Manoj Shrivastav 
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्यानंद देशपांडे, उपाध्यक्ष अ‍ॅड. तुषार महाजन, सचिव अ‍ॅड. रामानंद कवीमंडन, सदस्य अ‍ॅड. आनंद चेकेटकर, शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे शाळेच्या मुख्याध्यापिका अंतरकर, व्यवस्थापिका जगताप, उपमुख्याध्यापक देशपांडे, तसेच चौधरी बासिद सर व शिक्षकवृंदांनी स्वामिनीचे मनःपूर्वक कौतुक करून तिला पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या