तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
devendra-fadnavis : शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत जिप प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव यांच्या मार्गदर्शनात जिल्हा कार्याध्यक्ष आसाराम चव्हाण यांनी विधानभवन नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले.
या निवेदनात टीईटी पुनर्विचार याचिका महाराष्ट्र शासनद्वारे त्वरित दाखल करण्यात यावी. 15 मार्च 2024 नवीन संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यात यावा. शिक्षकांना अशैक्षणिक व आभासी कामातून विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी मुक्त करण्यात यावा.
‘समान काम समान वेतन’ धोरणानुसार, सरसकट विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. इतर कर्मचाèयांप्रमाणे शिक्षकांना 10-20-30 आश्वाशित प्रगती योजना लागू करण्यात यावी. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढ व जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक वेतनवाढ पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. याप्रसंगी सतीश मुस्कंदे, आकाश जाधव उपस्थित होते.