आकाशाचा सम्राट आणि शक्तीचे प्रतीक असलेला गरुड

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
 
eagle गरुड पक्षी पक्षिवर्गातील फॅल्कॉनिफॉर्मिस (Falconiformes) गणातील ॲक्सिपिट्रिडी (Accipitridae) कुलातील आकाराने मोठ्या, जाड व मजबूत चोच, मोठे पाय व अणकुचीदार नख्या, तीक्ष्ण नजर, लांब व रुंद पंख, उडण्याचा प्रचंड वेग असलेल्या तसेच शिकार करणाऱ्या ताकदवान पक्ष्यांना गरुड असे म्हणतात. या पक्ष्यांना इंग्रजीमध्ये ईगल (Eagle) असे म्हणतात. विशेषत: ॲक्विला (Aquila) प्रजातीतील पक्षी खरे गरुड म्हणून ओळखले जातात.
 
गरुड  
 
 
भारतात गरुड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांच्या सुमारे २४ जाती आहेत.आशिया व आफ्रिका येथे गरुडाच्या ६० जाती; तर उत्तर अमेरिकेमध्ये २, मध्य व दक्षिण अमेरिकेत ९ आणि ऑस्ट्रेलियामध्ये ३ अशा एकूण १४ जाती आढळतात. गरुड हा जगातील सर्वांत वेगवान उडणारा पक्षी असून तो ३२० किमी. प्रति तास वेगाने आकाशात उडू शकतो.गरुड हा एकमेव असा पक्षी आहे की तो वादळी ढगांवरून उडतो. म्हणजेच ते समुद्रसपाटीपासून १०,००० फूट उंचीवरून उडू शकतात. गरुडाचे पंख पातळ आणि दुमडलेले असतात, त्यामुळे ते खूप वेगाने उडू शकतात.त्यांचा उपयोग त्यांना सहज दिशा बदलण्यासाठी होतो.अंटार्क्टिका खंड वगळता इतर सर्व ठिकाणी गरुड पक्षी आढळतो.उंच पर्वत, घनदाट जंगले आणि वाळवंटात राहणे पसंत करतात.
गरुड साधारणपणे 30 वर्षांपर्यंत जगतो. त्याचे घरटे उंच झाडांवर किंवा दुर्गम टेकड्यांवर तयार केले जाते. साधारण 1-3 अंडी एकावेळी देतो, आणि दोन्ही आई-बाबा अंड्यांची काळजी घेतात. गरुडाच्या संपूर्ण डोक्यावर पिसे असतात, तर काही जातींत तुरा असतो. याची चोच मजबूत, पाय मोठे व बळकट तसेच पंजाच्या बोटापुढे बाकदार नख्या असतात. पंजाची पकड अतिशय मजबूत असते. डोळे अतिशय तीक्ष्ण असून ते ३-४ किमी.च्या अंतरावरून देखील त्याची शिकार पाहू शकते. मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. गरुड जोडीदाराबरोबर आयुष्यभर एकनिष्ठ असतात.eagle स्थलपरत्वे प्रजननाचा काळ बदलतो. ते आपली घरटी उंच व दुर्गम जागी बांधतात. दरवर्षी तेच घरटे वापरतात. एका वेळेला ३–५ अंडी घालतात. सहा ते आठ आठवड्यांत ती उबवली जातात. पिलांची वाढ हळूहळू होते. पिलांना तिसऱ्या ते चौथ्या वर्षांपर्यंत पूर्ण वाढलेला पिसारा दिसतो.
गरुड पक्षाचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत गरुड हे शक्ती, वीरता आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. विष्णू भगवानचे वाहन म्हणून गरुडाची ख्याती आहे. तसेच बौद्ध धर्मातही गरुडाला महत्त्वाचे स्थान आहे.