'तो' गैरव्यवहार तुकाराम मुंढे यांनी केला नाही - सामंत

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
नागपूर,
uday samant नागपूर हिवाळी अधिवेशनात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत तुकाराम मुंढे प्रकरणासंदर्भात स्पष्टतेसाठी स्पष्टीकरण दिले. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी मुंढे यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीवर प्रकाश टाकताना, सद्य परिस्थितीबाबत माहिती दिली.
 

uday samant 
उदय सामंत यांनी सांगितले की, ईओडब्ल्यू आणि पोलिस चौकशीत तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सध्या कोणताही निष्काळजीपणा किंवा गैरव्यवहार आढळलेला नाही. “महिला आयोगाकडे तुकाराम मुंढे प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल महिनाभरात येईल. अहवाल आल्यानंतर त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल,” असे सामंत यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
 

काय आहे आरोप?
भाजपाचे आमदार uday samant कृष्णा खोपडे आणि प्रविण तटके यांनी नागपूर महापालिका आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांकडून अनधिकृत पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत 20 कोटींचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात ईओडब्ल्यूने सांगितले की, महापालिकेत तुकाराम मुंढे यांच्या काळात 16 ते 18 कोटींच्या देयकांची काढणी योग्य प्रक्रिया करूनच करण्यात आली होती.उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, “महिलांबाबत सदस्यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी सुरु आहे. त्याचा अहवाल 15 ते 20 दिवसांत येईल. अहवालात जे आढळेल त्यानुसार कारवाई केली जाईल.”कृष्णा खोपडे यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सभागृहात तुकाराम मुंढे यांच्या गैरव्यवहारांविरुद्ध गंभीर आरोप केले होते. त्यांनी हेही सांगितले की, तक्रारी केल्यानंतर त्यांना फोनवरून धमक्या मिळाल्या असून, त्या धमक्यांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या कारणामुळे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधानसभेत खडाजंगी सुरू राहिली होती.