प्रजासत्ताकदिनाच्या परेडसाठी शिक्षकांच्या खिश्याला चोट

*चटई, चहा आणि बिस्किटांची व्यवस्था *शिक्षण विभागाच्या आदेशावर मुख्याध्यापकांमध्ये संताप

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
Republic Day Parade : प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी प्रत्येक शाळेत परेड आयोजित केली जाते. परेड सरावासाठी आणि प्रजासत्ताक दिनी प्रत्येक १० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नियुत करावा. या काळात गावातील नागरिकांना बसण्यासाठी चटई, खुर्च्या, चहा आणि बिस्किटे तसेच विद्यार्थ्यांसाठी तिरंगा रिबन आणि लाऊडस्पीकरची व्यवस्था शिक्षकांनाच करावी लागणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन नऊ महिने उलटूनही शाळांना अनुदान मिळालेले नाही. मात्र, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना स्वतःच्या खिशातून विविध खर्च करावा लागत असल्याने प्रजासत्ताक दिनासाठी अतिरित खर्च करण्याच्या आदेशामुळे मुख्याध्यापकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
 
 
 
k
 
 
 
जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये क्रीडा शिक्षकच नाही. ६० विद्यार्थ्यांमागे फत दोन शिक्षकांची पदे मंजूर आहेत. १० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक कसा नियुत करता येईल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिक्षण विभागाने गावातील मान्यवरांसाठी बसण्याची आणि चहा-बिस्किटे देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. अनुदान मिळण्यापूर्वीच मुख्याध्यापक आणि शिक्षकांना स्वखर्चाने विविध कार्यक्रम राबविण्यास भाग पाडले जात असताना प्रजासत्ताक दिनी होणार्‍या खर्चाची भर पडली आहे. प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये प्रभात फेरी काढल्या जाते. यात १० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नियुत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुतपणे हा आदेश जारी केला.
 
 
प्रजासत्ताक दिनी सकाळी प्रभातफेरी, गीत गायन, भाषणे आणि संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले जाते. शाळांमध्ये देशभतीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सरकार विविध उपक्रम राबवते, परंतु त्यासाठी निधीची तरतूद केली जात नसल्याची खंत स्वतंत्र समता शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी व्यत केली.