साखर भरलेला ट्रक अनियंत्रित!

*सक्षम स्कूलजवळ मध्यरात्री अपघात

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
accident : वर्धा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पवनार परिसरातील सक्षम स्कूलजवळ नांदेड येथून साखरेच्या गोण्या घेऊन नागपूरकडे जाणारा ट्रक अनियंत्रित झाल्याने रस्त्यालगत असलेले लोखंडी कठडे तोडत थेट डिव्हायडरवरून विरुद्ध दिशेला जाऊन खड्ड्यात आदळला. या अपघातात महामार्गालगत लागून असलेल्या लोखंडी कठड्यांचे तसेच ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
 

acc 
 
मिळालेल्या माहितीनुसार, एन.एल. ०१ ए.एफ. ४३९९ क्रमांकाचा ट्रक नागपूरकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गालगतचे लोखंडी संरक्षक कठडे तोडत, दुभाजकावरून विरुद्ध बाजूला जाऊन खड्ड्यात आदळला. ट्रक चालक मालक बालाजी केंद्रे आणि वाहक दोघेही बचावले. अपघाताच्या वेळी महामार्गावर वाहतूक नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
 
 
घटनेची माहिती मिळताच पोलिस व महामार्ग यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. ट्रकचे स्टिअरिंग फ्री झाल्याने वाहन नियंत्रणाबाहेर गेले होते ट्रकचे ब्रेकही काम करत नसल्याने हा अपघात झाल्याचे चालकाने सांगितले.