शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनाने आंदोलनाची सांगता

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
मानोरा, 
winter-session : हिवाळी अधिवेशनात शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नासाठी सुरू असलेल्या परिवर्तन शेतकरी संघटनेच्या लक्ष्यवेध ठिय्या आंदोलनाची शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निवेदन स्विकारुन आंदोलनातील मागण्याच्या संदर्भात संबंधित मंत्रालयाकडे पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मनोहर राठोड यांना दिल्याने त्यांनी आंदोलन समाप्त केले.
 

hjk 
 
तालुक्यातील शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसह सोमठाणा मानोरा शहरातून वाहणार्‍या नाल्याचे खोलीकरण करून तीर्थक्षेत्र असोला, तीर्थक्षेत्र धोतरा या रस्त्याला पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून निधी मिळावा, सोमनाथ नगर येथील मंजूर धरणाचे काम सुरू करण्यात यावे, विठोली ग्रामपंचायत मधील बेलोरा या गावाला महसूल दर्जा देण्यात यावा, सोमठाणा ग्रापंला स्मशानभूमीसाठी जागा घेण्यासाठी व कोडोली येथील स्मशानभूमीत कडे जाणार्‍या रस्त्याच्या बांधकामासाठी नाबार्ड मधुन निधी मंजूर करण्याच्या मागण्यासाठी परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे मनोहर राठोड यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेध ठिय्या आंदोलन सुरू केले होते. हिवाळी अधिवेशनात ११ डिसेंबर पासून परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने लक्षवेध ठिय्या आंदोलनाची १२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आंदोलनकर्ते मनोहर राठोड व शिस्टमंडळास ज्या विभागाच्या संबंधित प्रश्न आहे त्यांच्याकडे पाठपुरावा करून आपल्या मागण्या सोडविल्या जातील तसेच विठोली गट ग्रापं समाविष्ट असलेल्या बेलोरा गावाच्या लोकसंख्येचा अहवाल घेऊन कारवाई करण्यात येईल. सोमठाणा व कोंडोली स्मशानभूमीच्या जागा व रस्त्याच्या बांधकामासाठी नाबार्ड निधी संदर्भात उपस्थित ग्रामविकास उपसचिव यांना तातडीने नाबार्ड कडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती राठोड यांनी दिली. अतिवृष्टीच्या संत्रा व फळबागेचे अनुदान येत्या पंधरा दिवसात वितरित करण्याचे आदेशित करून आगामी फेब्रुवारी, मार्चमध्ये परिवर्तन शेतकरी संघटनेच्या मागण्या संदर्भात बैठक लावून उर्वरित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री भुसे यांनी दिल्याने सुरू असलेले लक्षवेध ठिय्या आंदोलन सोडण्यात आल्याची माहिती राठोड यांनी दिली.