हिंगणघाट,
hinganghat-municipal-council : हिंगणघाट नगरपरिषदेच्या स्थगित झालेल्या दोन प्रभागातील तीन जागांसाठी प्रचाराला पुनः सुरुवात झालेली आहे. या तिन्ही जागेच्या उमेदवारांची बैठक ११ नोव्हेंबरला निवडणूक कार्यालयात होऊन त्यात प्रभाग ५ मधील अ व ब तसेच प्रभाग ९ मधील ब येथील जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या पैकी कोणीही उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही. त्यांना २६ नोव्हेंबरला आवंटीत केलेले चिन्ह कायम ठेवण्यात आलेले आहे. या तिन्ही जागेसाठी मतदान २० डिसेंबरला होऊन २१ डिसेंबरला नगराध्यक्ष पदासह संपूर्ण प्रभागाचे निकाल घोषित करण्यात येणार आहेत असे निवडणूक निर्णय अधिकारी आकाश अवतारे यांनी जाहीर केले आहे.