समुद्रपूर,
cotton-crop-destroyed : शेतकर्यांच्या मागे लागलेली संकटाची मालिका कमी व्हायच नावच घेत नाही. आस्मानी व सुलतानी संकट दरवर्षी मागे लागले आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ त्याच्या पदरी बांधला आहे. यातुच कस बस पिक वाचलं तर जंगली जनावरे पिकाची नासाडी करण्यासाठी तैयारच आहे. यंदा एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी बेजार असताच नारायपूर येथील शेतकरी अनिल पुजदेकर यांच्या ३ एकर कपातीच्या शेतामध्ये रानडुक्कराच्या कळपाने शिरपूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
शेतकरी अनिल पुजदेकर यांनी अतिवृष्टीतून बचावलेल्या कापसाच्या पिकाला महागड्या रासायनिक खते किटकनाशक वापर करून सुधारले कपासीचे पीक शेवटी शेवटी जोमात आले. त्यांना चांगली बोंडे लागली. त्यामुळे आता थोडीफर पदरी पडून आर्थिक मदत होईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र नियतीला हे मान्य नव्हते शुक्रवारी रात्री कपाशीच्या पिकात रानडुक्करांनी घुसुन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यामध्ये शेतकरी अनिल पुजदेकर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा करून तात्कळ आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी अनिल पुजदेकर यांनी वनविभागाकडे केले आहे.