मोठी घोषणा! 'कर्जमाफीसंदर्भात' मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्ट बोल

समिती स्थापन Devendra Fadnavis

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
नागपूर
Devendra Fadnavis, मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. विरोधक आणि शेतकरी संघटनांकडून या संदर्भात सतत दबाव निर्माण केला जात आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि यासाठी एक समिती स्थापन केली आहे. १ जुलैपर्यंत कर्जमाफीच्या योजनेंचा ठराव करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
 
 

Devendra Fadnavis,  
विधानसभेत Devendra Fadnavis, बोलताना फडणवीस यांनी महायुती सरकारच्या काळात घेतलेल्या विविध धोरणात्मक निर्णयांची माहिती दिली. कर्जमाफीसंदर्भात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, अत्यधिक पावसामुळे राज्याच्या अर्थवस्थेवर ताण आल्यानंतर बजेटवरील दबाव वाढला आहे, तरीही सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेईल. "शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची आहे, हे आम्ही घोषित केले आहे आणि यासाठी एक समिती स्थापन केली आहे," असे ते म्हणाले.
 
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी Devendra Fadnavis, कर्जमाफीचे महत्त्व विशद करतांना, शेतकऱ्यांना फायद्याचा पोचावा यावर भर दिला. "कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही," असे ते म्हणाले. त्यांनी २०१७ आणि २०२० मध्ये कर्जमाफीची योजना लागू करण्यात आली होती, परंतु तरीही शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी कायम आहे. यावरून त्यांनी मान्य केले की, कर्जमाफीच्या योजनेतील काही अडचणी आहेत आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीतही काही सुधारणा आवश्यक आहे."हे सर्व असले तरी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कर्जमाफी लागू करणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी एक टप्प्याटप्प्याने उपाययोजना कराव्या लागतील. एक समिती या प्रकरणावर काम करत आहे आणि १ जुलैपर्यंत कर्जमाफीच्या योजना काय असतील याबाबत घोषणा केली जाईल," असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात आशा निर्माण झाली आहे, परंतु सरकारच्या कर्जमाफीच्या योजनेची अंमलबजावणी कधी होईल, याबाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता १ जुलैला सरकार कर्जमाफीच्या नेमक्या रूपरेषेबद्दल कोणती घोषणा करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.