माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची गुरु मंदिराला भेट

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
कारंजा लाड, 
dilip-walse-patil : ११ डिसेंबर रोजी येथील नृसिह सरस्वती स्वामी महाराज यांचे मंदिरात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली व महाराजांचे दर्शन घेतले.
 

jk 
 
दिलीप वळसे पाटील हे कारंजाचे जावई असल्यामुळे त्यांच्या भेटीची अनेकांना विशेष उत्सुकता असते. अधिवेशन काळात परतीच्या प्रवासात दिलीप वळसे पाटील यांनी गुरु मंदिराला भेट दिल्यामुळे अनेकांनी त्यांची भेट घेतली. नुकताच श्री गुरु मंदिर संस्थानला शासनाच्या निधीतून १७० कोटीचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. या आराखड्याच्या माध्यमातून विकसित होणार्‍या मंदिराच्या इमारतीचे मॉडेल ठेवण्यात आले असून, त्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी अवलोकन केले. या भेटीत वळसे पाटलांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, रंजीत डहाके, अतुल चिमगावे, प्रसन्न पळसकर, गुरु मंदिराचे विश्वस्त निलेश घुडे, पत्रकार अभय खेडकर, सुधीर देशपांडे, आर्ट ऑफ लिविंगचे सुशील देशपांडे, दंडवते व अनेकांची उपस्थिती होती.