नागपूर,
Government Schemes Mega Camp दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३१ अंतर्गत येणाऱ्या हनुमान नगर व चंदन नगर परिसरात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे महाशिबीर यशस्वीपणे आयोजित करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख युवा कार्यकर्ते तसेच प्रयास बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शक्ति ठाकुर यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही हे महाशिबीर हनुमान नगर व चंदन नगर वस्तीत स्वतंत्रपणे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये वयोश्री योजना, आधार कार्ड निर्मिती, पॅन कार्ड निर्मिती यासह केंद्र व राज्य शासनाच्या अनेक लाभदायक योजनांचा समावेश होता.

या महाशिबिराचा लाभ परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक व सुज्ञ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घेतला. शासकीय कर्मचारी, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तसेच प्रयास संस्थेच्या स्वयंसेवकांनी नागरिकांना योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले. दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी महाशिबिराला भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. Government Schemes Mega Camp नागरिकांचा वाढता सहभाग पाहता, शक्ति ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांनी पुढील वर्षी हे महाशिबीर अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आयोजकांच्या वतीने वस्तीतील सर्व नागरिकांचे सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.
सौजन्य: आशुतोष ठोंबरे, संपर्क मित्र