इस्रायलचा 'मोठा प्रहार'! हमासचा कुख्यात कमांडर राद सादचा खात्मा video

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
जेरुसेलम,
Israel Hamas conflict इस्रायलने (Israel) ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हमासच्या (Hamas) हल्ल्यात सहभागी झालेल्या वरिष्ठ कमांडर राद सादला ठार केले असल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाने (IDF) आणि सिक्युरिटी एजन्सींनी दिली आहे. इस्रायलच्या यानुसार, १३ डिसेंबर रोजी गाझामध्ये करण्यात आलेल्या हवाई कारवाईत राद सादचा खात्मा करण्यात आला.
 

Israel Hamas conflict 
इस्रायलने Israel Hamas conflict सांगितले आहे की राद साद हा हमासच्या लष्करी शाखेतील शस्त्रास्त्र निर्मितीचा प्रमुख होता आणि ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी होता. गेल्या काही महिन्यांत तो अत्यंत सक्रिय झाला होता आणि हमासच्या धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक मानला जात होता. इस्रायलच्या या कारवाईचा उद्देश हमासच्या लष्कर आणि शस्त्रास्त्र निर्मितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे हा आहे.सध्या इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी लागू आहे. युद्धबंदीच्या पहिल्या टप्प्यात कैद्यांच्या देवाण-घेवाणीचा टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यावर हमासने अद्याप मान्यता दिलेली नाही. यामुळे इस्रायल सातत्याने गाझामध्ये कारवाई करत आहे. नुकतीच इस्रायलने हमासच्या सैनिकांवर स्फोट हल्ला केला, त्यातच राद साद ठार झाल्याचा दावा केला आहे.गाझा परिस्थिती अद्याप बिकट आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर १,२०० हून अधिक हमासच्या नेतृत्त्वाखालील सदस्य ठार झाले, तर जवळपास २५१ लोकांना कैदी बनवण्यात आले. सध्या युद्धामुळे ७० हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, मोठ्या प्रमाणात लोक विस्थापित झाले होते. युद्धबंदीमुळे काही लोक परत येत असले तरी, इस्रायलच्या हमासविरोधी सततच्या कारवाईमुळे पुन्हा संघर्ष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी इस्रायलच्या हल्ल्यांत निरापराध नागरिकांचा बळी जाणा-यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे गाझा परिसरात तणाव कायम असून, युद्धबंदीच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अद्याप नियंत्रित झालेली नाही.