नागपूर,
Maharashtra Assembly महाराष्ट्र विधानसभेच्या अंतिम आठवड्यातील चर्चेदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी पोलिसांच्या तपासावर गंभीर सवाल उपस्थित करत संताप व्यक्त केला. पाटील यांनी नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या राम खाडेवरील हल्ल्याच्या प्रकरणाचा उल्लेख करत असे म्हटले, "पंधरा दिवस झाले, पण एकही आरोपी सापडलेला नाही. पोलीस काय हजामती करतात का?" यावरून वाद निर्माण झाला.
जयंत पाटील यांनी हल्ल्याच्या घटनेचा तपशील देताना सांगितले की, "राम खाडे हे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक देवस्थानांच्या जमीन घोटाळ्यांची चौकशी केली आणि त्यांना पोलीस संरक्षण देखील देण्यात आले होते. मात्र, ते संरक्षण सरकारने काढून घेतले आणि त्यांचा बंदुकीचा परवाना देखील नुतनीकरण केला नाही. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या वर झालेल्या हल्ल्यात एक पाय आणि एक हात तुटला, तरी अजून एकाही आरोपीला पकडलेले नाही."सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ल्याच्या तपासात पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करताना, पाटील यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले. "पोलिस काय हजामती करतात का?" असे म्हणत पाटील यांनी त्यांच्या असमर्थ तपासाच्या कारभारावर टीका केली. यावरून सभागृहात गोंधळ निर्माण झाला आणि मंत्री संजय सावकारे यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला. सावकारे यांनी पाटील यांना "अशा शब्दांचा वापर करू नका" असा इशारा दिला.
पाटील यांचे Maharashtra Assembly शब्द ऐकून सावकारे चिडले आणि म्हणाले, "तुम्ही मंत्री आहात, तुम्ही अशा शब्दांचा वापर करू नका." यावर जयंत पाटील चिडले आणि त्यांनी म्हणाले, "माझी मराठी कमी आहे का? तुम्ही पर्यायी शब्द द्या." पाटील यांच्या या शब्दांनी वाद तीव्र झाला आणि सावकारे यांना आव्हान दिले की, हजामती शब्दाचा अर्थ सांगावा.विरोधकांच्या चर्चेचा पारा चढत असतानाच, अध्यक्षांनी हस्तक्षेप करत हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. जयंत पाटील आणि संजय सावकारे यांच्यातील शब्दविनिमयात अधिक तीव्रता येऊ नये म्हणून, अध्यक्षांनी "हजामती" हा शब्द रेकॉर्डवरून काढण्याचा आदेश दिला
.
चर्चेच्या वेळी जयंत पाटील यांनी सत्ताधारी सरकारवर एकच हल्ला चढवला. "पोलीस तपासात असमर्थ आहेत आणि सरकारच्या संरक्षणाची भूमिका चुकीची आहे. तशीच हल्ल्याची घटना थांबवली जाऊ शकली असती, पण हल्ल्यामुळे राम खाडे यांना गंभीर दुखापत झाली," अशी गंभीर टीका पाटील यांनी केली.या प्रकरणात झालेल्या वादावर सभागृहात असंतोष व्यक्त झाला आणि सर्वच सदस्यांच्या नजरा पोलिसांच्या तपासावर वळल्या. यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत की, सरकार आणि पोलिस प्रशासनाची भूमिका काय आहे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेची शाश्वती कधी मिळणार?विधानसभेत या वादानंतर चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आणि जयंत पाटील यांच्या आरोपांची पडताळणी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.