आनंदवार्ता! तरुणांना रोजगार महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात होणार आयटी पार्क...

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
मुंबई,
IT Park, महाराष्ट्रातील आयटी क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमुळे राज्याला आयटी हब म्हणून ओळख मिळाली असून, देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आयटी पार्क म्हणून या परिसराचे महत्व वाढले आहे. या पार्कमुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि पुण्याच्या एकात्मिक विकासात आयटी क्षेत्राचा मोठा वाटा राहिला आहे.
 

IT Park 
हिंजवडीनंतर आता पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नवीन आयटी पार्क प्रस्तावित असून, सातारा जिल्ह्यातील आयटी पार्क उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. साताऱ्यातील या आयटी पार्कसाठी टाटा टेक्नॉलॉजीकडून प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यात येणार आहे, ज्याद्वारे हजारो तरुणांना आयटी क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण मिळेल. यामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील युवकांसाठी मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
 
 
याच संदर्भात IT Park, एक मोठी बातमी अशी आहे की, कोल्हापूरमध्येही आयटी पार्क विकसित होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर असलेला कोल्हापूर आयटी पार्कचा प्रस्ताव आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाच्या मुख्य सचिवांना शेंडा पार्क येथे आयटी पार्कसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे कोल्हापूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार असून, जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आयटी पार्कसाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार केला होता. पुणे विभागीय आयुक्तांचा अहवाल अप्पर मुख्य सचिवांकडे सादर करण्यात आला असून, मुख्यमंत्री आदेशानंतर शेंडा पार्क परिसरातील ३४ हेक्टर जमीन आयटी पार्कसाठी, ६ हेक्टर जिल्हा क्रीडा संकुलासाठी आणि २ हेक्टर शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयासाठी हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.यावेळी कृषी विभागाची जमीन वापरण्यात येणार असल्याने पर्यायी जागा देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असून, या विषयाकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लक्ष ठेवले आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार क्षीरसागर यांनी या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले होते.कोल्हापूर आयटी पार्क सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात एकूण चार मोठे आयटी पार्क कार्यरत असतील. पुणे (हिंजवडी), पुरंदर, सातारा आणि कोल्हापूर येथील पार्क्समुळे पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या आयटी पार्कांमुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि क्षेत्रीय आयटी उद्योगाला झपाट्याने विस्तार मिळेल अशी अपेक्षा आहे.