नागपूरचा शहराचा पारा ९.४ अंशांवर

थंड वार्‍यांमुळे वाढला गारठा

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
नागपूर,
nagpur-temperature : सध्या शहरात तापमानाचा पारा घसरला असून, संपूर्ण विदर्भ थंडीने कुडकुडत आहे. नागपूरचा शहराचा पारा ९.४ अंशांवर तर गोंदिया ८.८ अंशांवर पोहोचला आहे. थंडीची लाट असल्याने अनेक शहरांचा पारा १० अंशांच्या आसपास आहे. उत्तरेकडून थंड वार्‍यांमुळे मध्य भारत गारठला असून नवीन वर्षांचे स्वागत सुध्दा कडाक्याची थंडीने होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील काही दिवस पर्यंत नागपूरकरांना थंडीचा सामना करावा लागणार आहे. संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी असल्याने भारताच्या अनेक राज्यांमध्ये शीत लहरीचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
shekoti-one
 
सोमवारी, मंगळवारी किमान तापमानात किंचित होईल. गुरुवारपासून किमान तापमान घसरण्यास सुरुवात होईल. तर नाताळपर्यंत हुडहुडी कायम राहणार आहे.
 
 
थंडीची लाट राहण्याची शक्यता
 
 
विदर्भातील सर्वच शहरांचा पारा १० अंशांपर्यंत घसरला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या सर्व शहरांत किमान तापमानाची नोंद १० अंश सेल्सिअस आहे. थंडीची लाट राहण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला.