'तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही'

नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा गदारोळ

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Maharashtra Assembly राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा रविवारी समारोप होत असताना विरोधकांनी गदारोळ करून सभागृहात तणावाची स्थिती निर्माण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात अंतिम आठवड्याचे निवेदन मांडत असताना, विरोधकांनी "विदर्भाला काय दिलं?" या मुद्द्यावरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
 

Maharashtra Assembly 
गदारोळ सुरू झाल्यावर सत्ताधारी सदस्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण विरोधक ऐकायला तयार नव्हते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या फडणवीस यांनी सभागृहातच गदारोळ करणाऱ्या विरोधकांना खडसावले. "तुम्ही पहिल्यांदा निवडून आलेले आहात. तुम्हाला या सभागृहाची शिस्त माहिती नाही. या सभागृहाचा डेकोरमही माहिती नाही," असे ते म्हणाले.सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे वातावरण अधिकच तंग झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन वेळा "खाली बसा, खाली बसा" असे सांगून विरोधकांना शिस्त राखण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, "अशापद्धतीने काम होत नाही, असं गोंधळ करणं योग्य नाही."
 
 
त्यावरही विरोधक Maharashtra Assembly शांत न झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली. "जेव्हा मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात, तेव्हा एक शिस्त असते. मी जर तुलनात्मक बोलायला लागलो, की मागच्या काळात विदर्भाला काय मिळाले आणि आता काय मिळाले, तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही," असे ते म्हणाले.फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे विरोधक अधिकच उत्तेजित झाले, पण सभागृहात शांतता राखण्यात यश आले. यानंतर, सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरळीत होण्यास प्रारंभ झाला.यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम दिवशी झालेल्या या गदारोळाने राज्याच्या राजकारणात एक नवीन वाद सुरू केला आहे. विरोधकांच्या या वर्तणुकीवरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चासत्रं होण्याची शक्यता आहे.