कौशल्य विकास योजने सोबत बेरोजगारांसाठी नवीन संधी

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत माहिती

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Mangal Prabhat Lodha राज्यातील बेरोजगार युवकांसाठी सुरु असलेल्या कौशल्य विकास व प्रशिक्षण योजनांचा अंमल अधिक प्रभावीपणे करण्यात येईल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य राहुल पाटील यांच्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना मंत्री लोढा बोलत होते.
 

Mangal Prabhat Lodha  
मंत्री लोढा Mangal Prabhat Lodha यांनी सांगितले की, २००७ नंतर राज्यात बेरोजगारांसाठी कोणतीही ठोस योजना अस्तित्वात नव्हती. परंतु सध्या सुरु असलेल्या योजना रोजगार मिळवण्याच्या दृष्टिकोनाने नव्हे, तर प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे. सुरुवातीला सहा महिन्यांसाठी असलेली ही योजना निवडणुकीनंतर बंद न करता पाच महिने वाढविण्यात आली आहे. याशिवाय, राज्य सरकारने या योजनेसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केली असून, अर्थसंकल्पातही ४१८ कोटी रुपयांची राखीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे, या योजनेला बंद करण्याचा कोणताही प्रश्न उभा राहणार नाही, असे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.राज्यातील आयटीआय (इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टीट्यूट) संस्थांमध्ये नवीन, रोजगाराभिमुख व लोकप्रिय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. हे शॉर्ट टर्म अभ्यासक्रम विशेषतः बेरोजगार युवकांना तात्काळ रोजगार मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. पहिल्या टप्प्यात ५५ हजार विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घेतला आहे.
 
 
मंत्री लोढा यांनी पुढे Mangal Prabhat Lodha सांगितले की, 'मुख्यमंत्री स्वरोजगार योजना' सुरू करण्यात आली असून, या योजनेसाठी पहिल्या वर्षी ५ लाख बेरोजगार युवकांना लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला ३ टक्के व्याजदराने ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. ही कर्ज योजना फक्‍त कर्जपुरवठा पुरवीत नाही, तर प्रत्येक आयटीआयमध्ये इन्क्युबेशन सेंटर तसेच मेंटरशिप ग्रुपची स्थापनाही केली जाईल. यासोबतच, ऑनलाईन प्रश्न-उत्तर सुविधा असलेले एक ॲप देखील तयार करण्यात आले आहे.
 
 
योजना अंमलात आणल्यानंतर प्रशिक्षित विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि सहाय्य मिळेल, असे मंत्री लोढा यांनी सांगितले. या योजनेसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधक असलेले योगदान राहील आणि त्यामुळे बेरोजगारीच्या समस्येला काही प्रमाणात कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मंत्री लोढा यांच्या उत्तरानंतर विधानसभा सदस्य जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि योगेश सागर यांनी देखील चर्चा केली.