स्त्रीशक्तीच्या बळावर भारताचा उत्कर्ष

- केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा यांचे प्रतिपादन - ‘डब्लूएएचए’ विदर्भ प्रांत तर्फे हिंदू जीवनशैलीवर एकदिवसीय परिषदेचे उद्घाटन

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
नागपूर,
One-day conference : स्त्रीचा सन्मान करणे हे भारतीय संस्कृतीचे मूलभूत मूल्य असून भारत स्त्रीचे सशक्तीकरण करत नाही, तर स्त्रीशक्तीच्या सामर्थ्यावरच भारत उभा आहे, असे ठाम मत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा यांनी व्यक्त केले. वर्ल्ड असोसिएशन ऑफ हिंदू अकॅडेमिशियन ( डब्लूएएचए ), विदर्भ प्रांततर्फे रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात आयोजित ‘हिंदू जीवनशैली, सांस्कृतिक सामर्थ्य आणि सामाजिक समतोल’ या विषयावरील एकदिवसीय परिषदेत त्या बोलत होत्या.
 
 
 
DSC_9607
 
 
 
“परंपरा आणि प्रगतीचा संतुलित प्रवास” या मुख्य संकल्पनेवर आधारित या परिषदेतील ‘हिंदू आध्यात्मिकतेच्या दृष्टिकोनातून आधुनिक स्त्रीवादाचा अर्थ’ या पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी अन्नपूर्णा होत्या. पुढे बोलताना, विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल, तर परंपरा व आधुनिकतेचा सुसंवाद साधावा लागेल, असे त्या म्हणाल्या. यावेळी मंचावर एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, विश्व हिंदू अकादमी संघाचे समन्वयक व संशोधक डॉ. नचिकेता तिवारी, एलआयटीचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, रामदेवबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेंद्र पांडे, गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे उपस्थित होते. यावेळी ‘देश पुन्हा राष्ट्रीयतेकडे वाटचाल करत आहेत, जागतिकीकरण व विस्तारवादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभावना नव्याने उभी राहत असल्याचे भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय सचिव, लेखक व विचारवंत मुकुल कानिटक यांनी सांगितले. हिंदू जीवनदृष्टी वैश्विक असून ‘विश्व एक आहे’ हा संदेश देते; विविधतेत स्वीकारशीलता हेच आपल्या देशाचे सामर्थ्य आहे. परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. सीमा उबाळे, डॉ. अनिल शर्मा, मनोज तत्त्ववादी, डॉ. संजय कविश्वर आदींचे सहकार्य लाभले.