ऑटोच्या भीषण अपघातात ऑटोचालक जागीच ठार

वडकीच्या सैनिक धाब्यासमोरील घटना

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
auto-accident : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील वडकी येथील सैनिक धाब्यासमोर ऑटोचा भीषण अपघात झाल्याने या अपघातात ऑटो चालक जागीच ठार झाला. ही घटना रविवार, 14 डिसेंबर रोजी चारच्या सुमारास घडली. बंडू राठोड (चाळीसगाव, ता. हिंगणघाट) असे अपघातात ठार झालेल्या ऑटोचालकाचे नाव आहे. ऑटोचालक बंडू राठोड हा कारेगाव येथील अंकुश एकोणकर यांच्या ऑटोवर चालक होता. दुपारच्या सुमारास बंडू राठोड नातेवाईकाकडे साक्षगंध कार्यक्रमासाठी वडकी येथून किराणा ऑटोत टाकून गारगोटीकडे निघाला होता. मात्र वडकी येथील सैनिक धाब्यासमोरील चालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगतच्या दिशादर्शक फलकाला ऑटोची भीषण धडक झाली.
 
 
 
jk l
 
 
यामध्ये ऑटोचालक बंडू राठोडच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच महामार्गाची चमू, वडकी बीट जमादार निलेश चौधरी, गृहरक्षक प्रवीण चौधरी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता राळेगाव येथे पाठवण्यात आला. घटनेचा अधिक तपास ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनात नीलेश चौधरी करीत आहेत.