तभा वृत्तसेवा
उमरखेड,
kisan-wankhede : नागपूरात सुरू असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे यांनी लक्षवेधी सूचना मांडत विकास, रोजगार, शेतकरी आणि राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक सुरक्षेचे गंभीर प्रश्न सरकारसमोर ठामपणे मांडले.
उमरखेड व महागाव तालुक्यातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग व रेल्वे मार्गामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांचा थेट फायदा ग्रामीण भागातील आदिवासी, बंजारा व इतर युवकांना मिळावा, यासाठी या मतदारसंघात उद्योग-धंदे उभारण्यात यावेत, अशी ठोस मागणी आमदार वानखेडे यांनी केली. त्यामुळे युवकांना रोजगारासाठी बाहेर स्थलांतर करावे लागू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकèयांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांचे स्वागत करताना, साखर कारखान्यांसाठी ऊसाची जड वाहतूक होत असल्याने ग्रामीण भागातील पांदण रस्ते सिमेंटचे करण्यात यावेत, अशी मागणी केली. तसेच शेतकèयांना शेती व जनावरांसाठी पुरेसे पाणी मिळण्यासाठी धरणातून सोडण्यात येणाèया पाण्याचे योग्य व नियोजनबद्ध वितरण होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पाणी उपलब्ध असूनही नियोजनाअभावी शेती व जनावरांना त्रास सहन करावा लागत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
महागाव तालुक्यातील दहिसावळी (ता. महागाव) येथे राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे 16 ते 24 तास वाहतूक ठप्प झाल्याची गंभीर बाब मांडत तेथील पुलाची उंची वाढवावी तसेच बायपास मार्गावर प्लायओव्हर उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
याचबरोबर उमरखेड जवळील नागसवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचा धोका लक्षात घेता दोन प्लायओव्हर तातडीने उभारण्यात यावेत, अशी मागणीही आमदार किसन वानखेडे यांनी सभागृहात केली. एकूणच स्थानिक युवकांना रोजगार, शेतकèयांना सुविधा आणि महामार्गांवरील सुरक्षित वाहतुकीसाठी आमदार वानखेडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनांनी हिवाळी अधिवेशनात उमरखेड-महागाव मतदारसंघातील प्रश्नांना ठोस आवाज मिळाला आहे.
9 डिसेंबर रोजी तरुण भारतमध्ये आलेली बातमी उमरखेडचा विकास सुस्त उद्योगाशिवाय पर्याय नाही, अशी अधिवेशन विशेष बातमी आली होती. त्याची दखल घेत आमदार किसन वानखेडे यांनी सभागृहात याविषयी दखल घेत या बातमीतील विषय लक्षवेधी सूचनाद्वारे पटलावर मांडला. पांदण रस्ते, पूल बांधणी, शेतकèयांना शेतीसाठी योग्य पाणीनियोजन करण्याविषयी मत मांडले.