तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
taekwondo-championship-competition : नागपूर येथे आयोजित ‘फोर्थ मास्टर कप तायक्वांदो चॅम्पियनशिप’ स्पर्धेत जाजू इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध पदकांवर आपली छाप उमटवली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दमदार खेळ दाखवत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी पदके जिंकून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
कांस्यपदक विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये जुवेरिया शेख, अन्वी डेबरे, आयुष पाटील, विराट चौधरी, मधुर राऊत व ओम जाधव यांचा समावेश आहे. तर त्रिशा पठाडे, श्रीजल गौतम, जपनीत बेदी, एकता राठोड, आराध्या मानेकर, अंश मेहरा, नैतिक साळुंखे, द्रोण शर्मा व गौरव निनावे रोप्यपदक पटकावले आहे. अक्षदा राय, भक्ती किनेकर व वंशिका बारसांगडे यांनी सुवर्णपदकावर आपली मोहर उमटवली आहे.
या विद्यार्थांना क्रीडाशिक्षक आकाश गणवीर व दीपक शेलोटकर यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थाध्यक्ष प्रकाश जाजू, सचिव आशिष जाजू, कोषाध्यक्ष शिल्पा जाजू, शाळेचे मुख्याध्यापक सतीश उपरे, समन्वयक सुजाता पतिपाका, प्रशिक्षक व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.