शहरात मोकाट कुत्र्याचा सुळसुळाट

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
वाशीम, 
stray-dogs : शहरात कुत्र्याची संख्या अचानक वाढल्याने येथील नागरिक भयग्रस्त झाले आहे. मागील एक महिन्यापासुन शेकडो कुत्रे शहरात भटकताना दिसत आहेत. मोकाट कुत्रे रात्रंदिवस गल्ली बोळात व मुख्य रस्त्यावर भटकताना दिसत आहे. काहीही करा पण या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करा, अशी मागणी शहरातील महिला व शालेय मुलांच्या पालकांनी केली आहे.
 

k 
 
शहरात अनेक अनोळखी, वेगवेगळ्या रंगांची, काही मोठ्या आकाराचे तर काही रोगीट कुत्रे जोरजोरात भूंकत आडवे तिडवे पळतात. शहरात अचानक एव्हढ्या मोठ्या संख्येने हे कुत्रे शहरात कोठून आले असा प्रश्न नागरीकांतून उपस्थित केला जात आहे. नप प्रशासनाने सदर मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील महिलासह वाहन चालकातुन होत आहे. विशेष म्हणजे हे कुत्रे पंधरा ते कधी कधी, वीस, पंचवीस टोळक्याने एकत्र दिसत आहेत. अनेक वाहनचालक कुत्रा आड आल्याने पडून जखमी झाल्याचे अनेक वेळा घटना घडल्या. या मोकाट कुत्र्याला भूक लागली की, ते केव्हाही कुणाच्याही घरात कुठेही घुसतात आणि दिसेल ती वस्तू घेऊन पळ काढतात. लहान मुलाच्या हातातील वस्तू सुद्धा घेऊन जातात. एखाद्या दिवशी लहान मुलांचा जीवाला गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेत जाणारी लहान मुले कुत्र्याला घाबरून शाळेत जाण्याचे टाळत आहेत.