पेशाने डॉक्टर यश करतो क्रिकेट मैदानावर शब्द चिकित्सा!

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
प्रफुल्ल व्यास
वर्धा,
yash-kashikar : रुग्णाच्या त्वचेवरील सूक्ष्म लक्षणांतून आजार ओळखणारा आणि क्रिकेट मैदानावरील प्रत्येक हालचालीमागचा अर्थ अचूक हेरणारा यश काशिकर हा युवक बहुगुणी व्यक्तिमत्त्वाचा परिचय देतो! त्वचारोग विषयात एम.डी. केलेला यश पेशाने डॉटर असला तरी क्रिकेटवरील त्याचे प्रेम त्याला समालोचनाच्या व्यासपीठावर घेऊन आले. माईक हातात घेताच तो केवळ सामना सांगत नाही तर खेळाडूंच्या कामगिरीचे बारकाईने विश्लेषण करत क्रिकेटची शब्द-चिकित्सा करतो. वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेली शिस्त, अभ्यासाची सवय आणि निरीक्षणशक्ती यांचा प्रभाव त्याच्या समालोचनात ठळकपणे जाणवतो. त्यामुळे त्याचे भाष्य केवळ माहितीपूर्ण न राहता रसपूर्ण आणि अभ्यासपूर्ण ठरते. डॉटरकी आणि क्रिकेट या दोन वेगवेगळ्या विश्वांत यशने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून त्याचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
 

k 
 
यश वर्धेतील उद्योजक काशिकर परिवारातील! त्याने डॉटर ते समालोचक हा प्रवास उलगडला. बोलता बोलता तो म्हणाला वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास आणि क्रिकेट समालोचनाची आवड दोन्ही सांभाळताना अनेक अचडणी आल्या. पण, छंदाने या सर्व अडचणींवर मात करता आली. एबीबीएस नंतर एमडी आणि जिथे कुठे क्रिकेट मॅच असेल तिथे पोहाचणे तसे फार कठीण काम होते. २००३ चा वर्ल्डकप आपण वयाच्या सातव्या वर्षी बघितला. शाळेत कथाकथन, वत्कृत्व स्पर्धेत भाग घेत असल्याने बोलण्याची सवय होती. शाळेत क्रिकेट खेळताना सहज कॉमेंट्री करत होतो. २०१६ मध्ये इएसपीएनतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत २६ हजार समालोचकांनी भाग घेतला होता. त्यात आपली पहिल्या आठमध्ये निवड झाली आणि आपल्याला टर्निंग पॉईंट मिळाला. नंतर व्वेबसाईट सुरू केली. युट्यूबवर व्हीडिओ टाकले. हळूहळू विदर्भ रणजीसोबत जुळलो. त्रिपुरा येथे झालेल्या व्युमीन टी. २० लिगमध्ये समालोचक म्हणून काम केले. पुढे वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (श्यामजीपंत) येथे असलेल्या राजस्थान रॉयल येथे नेपाळ सोबत झालेल्या क्रिकेट स्पर्धेसाठीही समालोचन केले. पॉण्डेचरी, पुणे येथे ऑलेपिंयाड ट्रॉफी टी-२० साठीही समालोचन केले.
 
 
समालोचन करणे म्हणजे फत बडबड करणे नव्हे तर तुम्हाला तुमच्यासाठी सुचना द्याव्या लागतात. तोंडातून शब्द बाहेर पडण्यापूर्वी ठरवून बोलावे लागते. जे काही ते ऑन द स्पॉट असते. प्रत्यक्ष हजारो आणि दूरदर्शनवर लाखो प्रेक्षक आपल्याला बघत असतात. त्यामुळे तेथे चुकीला माफी नसतेच. कानात एक पीन दिलेली असते. त्या माध्यमातून सर्व सुचना मिळतात. त्या सुचना आणि प्रत्यक्षात खेळ याचा ताळमेळ साधावा लागतो, असे यश काशिकर याने सांगितले. साधारणत: क्रिकेट खेळनारेच समालोचन करतात, असे आपण बघितले आहे. नॉन क्रिकेटीअरला तेथे फार स्थान नसते. परंतु, आपण आपली जागा तयार केली असल्याचे त्याने सांगितले. आपण क्रिकेट समालोचनाची सुरुवात नागपुरात ना. नितीन गडकरी घेत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातून झाली. विदर्भातील खेळाडू आंतर राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळावा आणि त्या खेळाचे समालोचन आपण करावे, हेच आपले स्वप्न आहे. हर्षा भोगले आणि जतिन सप्रू हे आपले आदर्श आहेत, असे यश विनय काशिकर याने सांगितले.